1 / 7वजन वाढायला सुरुवात झाली असेल तर आतापासूनच आहाराबाबत काही नियम पाळायला सुरुवात करायला हवी. या काही साध्या सोप्या गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्या तरी वजनात खूप फरक दिसून येतो. 2 / 7कारण या गोष्टींमुळे पचनक्रिया आणि चयापयच क्रिया अधिक चांगली होते आणि त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित झाल्याने शरीरात अतिरिक्त चरबी साचून राहात नाही (start eating 5 foods daily for fast weight loss). त्यासाठी नेमकं काय करायला हवं ते पाहुया...(food that helps for fast weight loss)3 / 7सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करावी. कोमट पाणी प्यायल्याने पचन चांगलं होतं आणि शिवाय शरीर हायड्रेटेड राहण्यासही मदत होते.4 / 7रात्री झोपण्यापुर्वी १ टीस्पून जिरे आणि १ टीस्पून धने १ ग्लास पाण्यात भिजत घालायचे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि गरम करून प्यायचं. यामुळेही चयापचय क्रिया चांगली होते आणि शरीरातली जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते.5 / 7जेवण झाल्यानंतर नुसतीच बडिशेप खाण्याऐवजी त्यासोबत थोडा ओवा, काळं मीठ असे पदार्थही खा. यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते.6 / 7 जेवणाची सुरुवात करण्यापुर्वी सलाड, कोशिंबीर, कडधान्यांच्या उसळी असे पदार्थ खाण्यास भर द्या. या पदार्थांमध्ये फायबर आणि प्रोटीन्स जास्त असल्याने तब्येतीलाही फायदा होतो आणि वजनही कमी होते.7 / 7नाश्त्यामध्येही फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे. कारण त्यामुळे पोट पुढे बराच वेळ भरल्यासारखे राहाते आणि शुगर क्रेव्हिंग कमी होते.