पोट सुटलंय? जेवणाच्या ताटातून 5 पांढरे पदार्थ वगळा; आपोआप पोट सपाट होईल-स्लिम दिसाल
Updated:September 27, 2025 09:40 IST2025-09-27T09:37:00+5:302025-09-27T09:40:02+5:30
Do Not Eat 5 white foods For Weight Loss : दुधात कॅल्शियम आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते पण यात एक्स्ट्रा फॅट आणि साखरही असते.

आजकाल बदलत्या जीवनशैलीत अन्हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांचं पोट सुटतं. वजन वाढलं की अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. पोट कमी करण्यासाठी व्यायाम किवा डाएट जमत नसेल तर तुम्ही रोजच्या जेवणात बदल करू शकता. (Do Not Eat This 5 W hite Foods For Weight Loss )
लठ्ठपणा कमी करण्यासाठी पांढर्या रंगाचे पाच पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. हे पदार्थ नेमके कोणते आणि रोजच्या जेवणात का खाऊ नये ते समजून घेऊ.
साखर
केक, पेस्ट्री, चहा, कॉफी यात साखर असते. वारंवार गोड पदार्थ खाल्ले की शरीरातलं फॅट वाढतं आणि तुम्ही लठ्ठ दिसू शकता.
मीठ
मिठानं अन्नाला चव येते पण योग्य प्रमाणात खाल तरंच फायदेशीर ठरेल. जास्त खारट पदार्थांचे सेवन केल्यानं वजन वाढतं, सूज वाढते. हृदयाचे विकार वाढण्याचा धोका असतो.
मैदा
बेकरी आयटम्स, फ्राईड स्नॅक्स खाणं पूर्णपणे टाळा. मैद्याचे पदार्थ पोटात चरबी जमा करतात जे बराच काळ तसेच राहील्यानं वजन आणि फॅट दोन्ही वाढवतात.
दुधाचे पदार्थ
दुधात कॅल्शियम आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते पण यात एक्स्ट्रा फॅट आणि साखरही असते. ज्यामुळे वजन वाढू शकतं. याऊलट तुम्ही दह्याचे सेवन करू शकता.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजनवाढ कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण लवकरात लवकर घ्या. रात्री उशीरा जेवल्यानं वजन जास्त वाढू शकतं.