Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडीत ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? ताक कधी, कसं प्यावं, समजून घ्या-फायदे मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 21:14 IST

1 / 8
थंडीच्या दिवसांत ताक, दही अशा पदार्थांचे सेवन करायचं की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही हिवाळ्यातही ताकाचं सेवन करू शकता. (Right Way To Drink Buttermilk In Winter)
2 / 8
दुपारच्यावेळी ताक पिणं सर्वात उत्तम ठरतं. संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्यावेळी ताक पिणं टाळावं. ( Is Buttermilk Good For Consuming During Winter?)
3 / 8
थंडीच्या दिवसांत रात्री ताक प्यायल्यास कफ दोष वाढतो घसा खवखवण्याची समस्या वाढू शकते. अनेकांचे पोटसुद्धा खराब होते.
4 / 8
ताक पचायला हलके असते आणि ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. थंडीत कमी पाणी प्यायले जाते. त्यामुळे ताक शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
5 / 8
ताकात असणारे प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.जेवणानंतर ताक प्यायल्यास एसिडीटीचा त्रास कमी होतो.
6 / 8
साध्या ताकाऐवजी मसाला ताक पिण्यास प्राधान्य द्या. मसाल्यांमुळे ताकाचा थंडावा कमी होतो आणि ते शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते.
7 / 8
ताक प्यायल्यानंतर लगेच गुळाचा एक लहान खडा खाल्ल्यास थंडीचा त्रास होत नाही असं मानलं जातं.
8 / 8
खूप थंड ताक पिणं टाळा.ताक नेहमी रूम टेम्परेचरवरचेच असायला हवे किंवा कोमट करून प्या.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहिवाळ्यातला आहारहेल्थ टिप्स