शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर करणारा चवदार उपाय- जेवणात घ्या ५ पदार्थ; भरपूर प्रोटीन्स मिळतील
Updated:August 4, 2025 15:55 IST2025-08-04T15:51:13+5:302025-08-04T15:55:39+5:30

बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी पुढे सांगितलेले काही पदार्थ तुमच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात घेत चला..
पहिला पदार्थ म्हणजे राजमा आणि त्याच्या जोडीला भात. राजमामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. जेव्हा तुम्ही राजमा आणि भात असं एकत्र करून खाता तेव्हा त्यातून संपूर्ण प्रोटीन्स तुमच्या शरीराला मिळतात.
मटार पनीर पुलाव या पदार्थातूनही भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.
पनीर पुलाव हा देखील एक भरपूर प्रोटीन्स देणारा पदार्थ आहे. पनीरमधून प्रोटीन्स मिळतात, भाज्यांमधून फायबर मिळतात. आणि जेव्हा त्याच्या जोडीला भात असतो तेव्हा तो पदार्थ अतिशय पौष्टिक, रुचकर होतो.
मुगाच्या डाळीची खिचडी हा देखील एक उत्तम पदार्थ आहे. पचायला अतिशय हलका आणि भरपूर प्रोटीन्स देणारा. मुगाच्या डाळीची खिचडी करताना डाळ आणि तांदळाचे प्रमाण मात्र समान असावे आणि त्याच्या जोडीला भाज्याही घालाव्या.
भरपूर प्रोटीन्स देणारा आणखी एक पदार्थ म्हणजे बेसनाच्या पिठाचे धिरडे. त्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेल्या भाज्याही घाला. फायबर मिळून त्याची पौष्टिकता आणखी वाढेल.