1 / 8शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी अनेकजण बाजारात विकत मिळणारे प्रोटीन शेक पितात. पण त्या महागड्या पावडरवर पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या स्वयंपाक घरातलेच काही पदार्थ आपण नियमितपणे खाल्ले तर प्रोटीन्सची कमतरता निश्चितच भरून निघू शकते.2 / 8ते पदार्थ कोणते याची माहिती डाॅक्टरांनी drbhagyeshkulkarni या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली असून त्यापैकी काही पदार्थ तर अगदी रोजच आपल्या स्वयंपाक घरात असतात.3 / 8त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे शेंगदाणा. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्स आणि गूड फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर त्यातून चांगले प्रोटीन्स मिळतात.4 / 8हिरव्या वाटाण्यांमधूनही चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळतं. त्यामुळे जेव्हा सिझन असेल तेव्हा हिरवे वाटाणे भरपूर खा. आणि नंतर ते फ्रोजन करूनही तुम्ही खाऊ शकता.5 / 8टोफूमधूनही चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. तुमच्या भागात टोफू मिळत असेल तर पनीरऐवजी टोफू खाण्यास प्राधान्य द्या.6 / 8बदाम हा देखील प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहे. रोज सकाळी ५ ते ६ भिजवलेले बदाम खायला हवेत.7 / 8बदामाप्रमाणेच अक्रोडमधूनही चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. शिवाय त्यातून हेल्दी फॅटदेखील मिळतात.8 / 8घरी काढलेलं नारळाचं दूध जर वेगवेगळ्या पदार्थांमधून नियमितपणे घेतलं तर त्यातूनही गूड फॅट्स तसेच प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात मिळतात.