९० टक्के लोकांना वाटतं की 'या' पदार्थांमधून भरपूर प्रोटीन्स मिळतात! पण तसं नसतं, बघा ते कोणते
Updated:September 20, 2025 13:06 IST2025-09-20T13:01:18+5:302025-09-20T13:06:35+5:30

बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता दिसून येते. ती भरून काढण्यासाठी तज्ज्ञ प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.
पण यात सर्वसामान्य लोकांचा नेमका गोंधळ उडतो. असे काही पदार्थ आहेत जे प्रोटीन रिच आहेत म्हणून आपण समजतो. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामधून खूपच कमी प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी amitagadre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
त्यापैकी पहिला पदार्थ आहे मशरूम. मशरूम आरोग्यदायीच आहेत. पण प्रोटीन्स मिळावं म्हणून ते खात असाल तर थांबा. कारण जर तुम्ही १०० ग्रॅम मशरूम खाल्ले तर त्यातून फक्त २ ते ३ ग्रॅम प्रोटीन्सच मिळतात.
दुसरा पदार्थ आहे पीनट बटर. त्यातून प्रोटीन्सपेक्षा जास्त फॅटच मिळतात.
बदामाच्या दुधातून पण भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात असा अनेकांचा समज आहे. जर तुम्ही १ कप बदामाचं दूध प्यायलं तर त्यातून १ ते २ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. त्यापेक्षा गायीचं दूध प्रोटीन्सच्या बाबतीत जास्त समृद्ध आहे.
क्युनोआ हेे धान्यही प्रोटीन्सचा उत्तम स्त्राेत म्हणून खाल्लं जातं. पण प्रत्यक्षात मात्र त्यातून खूपच कमी प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.
ब्रोकोली ही एक निश्चितच पौष्टिक अशी भाजी आहे. पण त्यातून खूपच कमी प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.