महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Updated:February 25, 2025 20:39 IST2025-02-25T12:09:37+5:302025-02-25T20:39:21+5:30

महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

आपल्याकडचे काही सणवार किंवा उपवास- व्रत असे असतात की त्या दिवशी एखाद्या पदार्थाला किंवा एखाद्या फळाला खूप जास्त महत्त्व असते. असंच काहीसं महाशिवरात्रीचं सुद्धा आहे.(Mahashivratri 2025)

महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

महाशिवरात्रीला घरोघरी उपवास केला जातो. या दिवशी उपवासाचे इतर पदार्थ तर खाल्ले जातातच. पण कवठ या दिवशी आवर्जून खाल्लं जातं. या दिवशी कवठाला विशेष मान असतो आणि महाशिवरात्रीच्या पुजेमध्येही ते ठेवलं जातं. आपल्याकडच्या सणावारांचं एक खास वैशिष्ट्य असं की जो सण ज्या ऋतूमध्ये येतो त्या ऋतूमध्ये आपल्या आरोग्यासाठी जे काही उत्तम असतं त्याचा नैवेद्य उपवासाला दाखवला जातो. त्यामुळे सणावारांच्या दरम्यान दिसून येणारी आपली खाद्यसंस्कृती थेट आरोग्याशी आहे.(importance of eating kavath or wood apple on Maha Shivratri Fast)

महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

म्हणूनच या दिवसांत येणारं कवठ त्यानिमित्ताने खाल्लं जावं यासाठी त्याला महाशिवरात्रीच्या काळात खूप महत्त्व असतं. या दिवसांत उष्णता वाढायला सुरुवात होते आणि भूक मंदावते. कवठ खाल्ल्याने मात्र भूक वाढण्यास मदत होते.

महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

पोटातील जंत कमी करण्यासाठी कवठ एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. त्यामुळे लहान मुलांनाही ते आवर्जून खायला द्यावं.

महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

कवठ खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही कवठ उपयोगी ठरतं.

महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

ज्यांना नेहमीच बद्धकोष्ठतेचा त्रास असतो अशा लोकांना कवठ खाणं फायद्याचं ठरतं. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

महाशिवरात्रीला कवठ का खायलाच हवे? बघा कवठ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

कवठामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तसेच बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, थायमिन आणि राइबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असतात.