Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीचा उपवास कधी सोडावा-कसा सोडावा? उपवास सोडताना काय खावं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:31 IST

1 / 8
महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2026) उपवास साधारणपणे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच अमावस्येच्या तिथिला सोडला जातो. हा उपवास कसा सोडावा जेणकरून तब्येतीला त्रास होणार नाही आणि उपवासाचा पुरेपूर फायदाही होईल ते समजून घेऊ. (How To Break Mahashivratri Fast)
2 / 8
देवाला अर्पण केलेला नैवेद्य ग्रहण करून उपवासाची सांगता करावी. दिवसभर निर्जळी किंवा कमी पाण्याचा उपवास असल्यास सुरूवातीला थोडं कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिऊन शरीराला हायड्रेट ठेवावे. (How To Close Mahashivratri Fast)
3 / 8
रक्तातील साखरेतील पातळी संतुलित करण्यासाठी एखादं फळ किंवा खजूर खाऊ सुरूवात करावी. उपवास सोडताना आहार नेहमी सात्विक आणि हलका असावा. अतिशय तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणं टाळावं.
4 / 8
आहारात दही किंवा ताकाचा समावेश करावा. यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्था शांत ठेवतात आणि गॅसचा त्रास होऊ देत नाहीत. उपवास सोडताना वडे, भजी किंवा साबुदाणा खिचडी खाणं टाळावं. कारण यामुळे एसिडिटी वाढते.
5 / 8
जेवणात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा. शक्य असल्यास सैंधव मिठाचा वापर करा. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आहारात दुधी भोपळा, पडवळ किंवा पालेभाज्यांचा समावेश करा. जेणेकरून बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.
6 / 8
अन्नाचा प्रत्येक घास नीट चावून खा. घाईघाईत जेवल्यावर पोटावर ताण येतो आणि पोट फुगल्यासारखं वाटतं. उपवास सोडताना लगेच कडक चहा किंवा कॉफी पिऊ नका. यामुळे पित्त होण्याची शक्यता असते.
7 / 8
एकाचवेळी खूप जास्त जेवू नका. थोड्या थोड्या अंतरानं खाणं आरोग्यासाठी हितकारक ठरते. जर तुम्हाला खूप अशक्तपणा वाटत असेल तर उपवास सोडताना नारळ पाणी घेणं एक उत्तम इलेक्ट्रोलाईट म्हणून काम करते.
8 / 8
उपवास सोडताना जेवणात फक्त कार्ब्स न ठेवता प्रथिनांचा आहारात समावेश करा. यामुळे तुम्हाला दिवसभर तृप्त वाटतं आणि पुन्हा पुन्हा भूक लागून होणारी ओव्हरइटींग टाळता येते.
टॅग्स : महाशिवरात्रीअन्नहेल्थ टिप्स