Join us   

वजन कमी करायचं तर आहारात 9 गोष्टी हव्याच, वेटलॉससाठी अचूक आहाराचं सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 7:31 PM

1 / 9
सफरचंद:- सफरचंदात पेक्टिन नावाचा घटक असतो. हा घटक विरघळणारं फायबर म्हणून ओळखलं जातं. वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला एक सफरचंद खाणं फायदेशीर मानलं जातं.
2 / 9
ब्रोकोली:- ब्रोकोली वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त भाजी आहे. ब्रोकोलीत क जीवनसत्व, फोलेट, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे महत्वाचे घटक असतात. ब्रोकोली ही भाजी वजन कमी करण्यासोबतच शरीरातील पोषणाची कमतरता ब्रोकोली भरुन काढते.
3 / 9
पनीर:- प्रथिनंयुक्त पनीरचा समावेश वजन व्यवस्थापनासाठी होतो. वजन कमी करण्यासाठी आहारात प्रथिनांचं प्रमाण भरपूर असणं आवश्यक असतं. प्रथिनयुक्त पनीर खाल्ल्यानं वजन कमी करण्यास मोठा हातभार लागतो,
4 / 9
कीनोआ:- प्रथिनं आणि फायबरयुक्त कीनोआ खाल्ल्यास पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. सतत लागणारी भूक कमी होते. कीनोआमध्ये 9 महत्वाची अमीनो ॲसिडस असतात म्हणून वजन कमी करण्यासाठी आहारात कीनोआ असण्याला महत्व आहे.
5 / 9
सिमला मिरची:- लाल, पिवळ्या, हिरव्या सिमला मिरचीत रंगाप्रमाणे पोषक घटक असतात. सिमला मिरचीत पाण्याचं प्र्माण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. वजन कमी करण्यास फायदेशीर अशी सिमला मिरचीची ओळख आहे.
6 / 9
अक्रोड:- अक्रोडमध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड, ई जीवनसत्व, फोलेट, काॅपर हे शरीरास आवश्यक घटक असतात. अक्रोड प्रमाणात खाल्ल्यास भूक कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास फायदेशीर असतात.
7 / 9
चिया सीड्स:- चिया सीड्समध्ये प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात. एका ग्लासमध्ये चमचा चिया सीड्स भिजवून दुपारी जेवणाआधी चिया सीड्सयुक्त पाणी पिल्यास त्याचा वजन कमी होण्यास फायदा होतो असं तज्ज्ञ म्हणतात.
8 / 9
ओट्स:- ओट्सला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर सूपरफूड म्हटलं जातं. नाश्त्याला ओट्सचे पदार्थ खाणं हा वजन कमी करण्यास उत्तम पर्याय आहे. दुधासोबत किंवा भाज्या घालून ओट्स खाल्ल्याने शरीरास पोषक घटक मिळतात आणि वजनही कमी होतं.
9 / 9
पालक:- आहारात पालक असल्यास भूक नियंत्रणात राहाते. पालकामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं . पालकाची भाजी, पालकाचे पदार्थ खाल्ल्यास पोट भरपूर वेळ भरलेलं राहात त्यामुळे पालक वजन कमी करण्यास फायदेशीर पालेभाजी मानली जाते. 
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यआहार योजना