कॉर्टीसॉल हार्मोन कमी झाला तर वजन आपोआप उतरेल! घ्या सोपा उपाय- अंगावरची चरबी वितळेल भराभर..
Updated:March 14, 2026 09:35 IST2026-03-14T09:30:40+5:302026-03-14T09:35:01+5:30

शरीरातला स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कॉर्टीसॉल जर वाढला तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अंगावरची चरबी वाढू लागते. पाेट सुटतं..
आता शरीरातलं वाढलेलं कॉर्टीसॉल कमी केलं तर त्याचा परिणाम आपोआपच आपल्या वजनावर दिसून येतो. वजन कमी होतं. शिवाय पोटावरची वाढलेली चरबीही कमी होते.. त्यासाठीच नेमकं काय करायचं ते पाहुया..
कॉर्टीसॉल कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dietitianshreya या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की केशर घेऊन वाढलेलं वजन आणि कोर्टीसोल या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवता येतात.
यासाठी रात्री १ ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये केशराच्या ४ काड्या घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने शरीातलं कॉर्टीसॉल हार्मोन्सचं प्रमाण कमी होईल आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे वाढलेलं बेली फॅट कमी होण्यासाठीही मदत होईल.
यासोबतच केशराचं पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. केशराचं पाणी पिणं तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरणारं आहे. त्वचेवर छान ग्लो येईल.
शिवाय ॲक्ने, ब्रेकआऊट्स, कमी वयात येणाऱ्या सुरकुत्या कमी होऊन त्वचा फ्रेश, टवटवीत दिसण्यासही मदत होईल.
केशराचं पाणी रोज प्यायल्यास मासिक पाळीचा त्रासही कमी होतो.
ॲनिमियाच्या लोकांनी केशराचं पाणी रोज प्यायला हवं. अंंगातलं रक्त वाढण्यास मदत होते.