Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थुलथुलीत शरीर बदलेल रूप होईल सडपातळ- 'या' पद्धतीने रोज ब्लॅक कॉफी प्या, पाहा तुमचा मेकओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 13:02 IST

1 / 7
वजन वाढायला लागलं की सगळ्यात आधी त्याचा परिणाम दंड, मांड्या, कंबर, ओटीपोट या भागावर दिसू लागतो आणि हळूहळू शरीर गुबगुबीत, बेढब व्हायला लागतं.
2 / 7
वजन कमी करण्याच्या कित्येक पद्धती आहेत. त्यामध्ये ब्लॅक कॉफी पिणे हा एक पर्यायही अनेक आहारतज्ज्ञ सुचवतात (how to make black coffee for weight loss?). योग्य पद्धतीने केलेली ब्लॅक कॉफी जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतली तर त्याचा फायदा नक्कीच वेटलॉस करण्यासाठी होऊ शकतो.(black coffee recipe)
3 / 7
त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाजारात मिळणाऱ्या चांगल्या दर्जाच्या इंस्टंट कॉफी वापराव्या (weight loss special black coffee). कारण हलक्या दर्जाच्या कॉफीमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते.
4 / 7
आता यानंतर कपामध्ये १ ते २ टीस्पून कॉफी पावडर घालावी. आणि त्यानंतर त्यामध्ये उकळतं पाणी मिसळावं. कपामधलं पाणी व्यवस्थित हलवून घेतलं की परफेक्ट ब्लॅक कॉफी झाली तयार.
5 / 7
ही कॉफी उपाशीपोटी पिणं टाळावं. कारण त्यामुळे ॲसिडीटी, एन्झायटीचा त्रास होऊ शकतो. ही कॉफी शक्यताे नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर अर्ध्या एक तासाने पिणे योग्य. दिवसातून एकदा किंवा दोनदाच या पद्धतीची ब्लॅक कॉफी प्यावी. तिचा अतिरेक टाळावा.
6 / 7
ब्लॅक कॉफी प्यायल्याने लगेच वजन कमी होईल असं नाही. त्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याचे काही नियम पाळणंही गरजेचं आहे. आहार संतुलित असावा. तेलकट, तुपकट, मैदायुक्त पदार्थ खाणं टाळावं.
7 / 7
याशिवाय रोजच्या रोज काही व्यायाम करणंही खूप गरजेचं आहे. यासगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा एकत्रित फायदा हाेऊन वजन निश्चितच कमी होऊ शकतं.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहोम रेमेडी