1 / 6वाढत्या वजनाची, तब्येतीची चिंता वाटत असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय दररोज अगदी नियमितपणे करून पाहा. काही दिवसांतच खूप चांगला फरक जाणवू लागेल.2 / 6हा उपाय आपल्याला नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण अशा तिन्ही खाण्यानंतर करायचा आहे. आणि त्यासाठी प्रत्येकी १०- १०- १० मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. 3 / 6त्यावेळेत मध्यम गतीने वॉकिंग करायचं आहे. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण अशा प्रत्येक जेवणानंतर जर तुम्ही १० मिनिटे चाललात तर वजन तर कमी होईलच पण आरोग्याला खूप फायदेही होतील.4 / 6बऱ्याच लोकांना नेहमीच अपचन, ब्लोटिंग, गॅसेस, ॲसिडीटी असे त्रास होतात. हे त्रास कमी करण्यासाठीही प्रत्येक जेवणानंतर वॉकिंग करणे खूप फायदेशीर ठरते. 5 / 6जेवणानंतर रक्तातली साखर वाढते. हे टाळण्यासाठीही जेवणानंतर केलेलं वॉकिंग खूप फायदेशीर ठरतं. मधुमेही लोकांना तर याचा विशेष फायदा होतो.6 / 6काही लोकांना दुपारच्या जेवणानंतर खूप सुस्ती, आळस येतो. काम करण्याचा मूड नसतो. अशा लोकांसाठीही वॉकिंग खूप फायदेशीर ठरते. कॅलरी बर्न होतात. त्यामुळे दिवसभर आपण ॲक्टीव्ह, फ्रेश राहातो.