Join us   

Gudhi Padva 2022: गुढीपाडव्याला कडुनिंब का खातात? कडुनिंबाच्या चटणीचे काय महत्व? बघा चटणीची परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 4:17 PM

1 / 10
१. Gudhi Padva Special: चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा... मराठी नववर्षाची एक प्रसन्न सुरुवात.. यादिवशी प्रत्येक घरासमोर दिसणारी गुढी खरोखरंच वातावरण मंगलमय करते...
2 / 10
२. पण एवढा नववर्षाचा पहिला दिवस, दारात गुढी उभारलेली आणि याच दिवशी कडू खाऊन वर्षाची सुरुवात का करायची, असा प्रश्न अगदी साहजिक आहे...
3 / 10
३. कारण कडुनिंबाच्या पाल्याशिवाय गुढीपाडवा जणू साजराच होत नाही. कारण गुढीलाही कडुनिंबाची पानं बांधण्यात येतात आणि शिवाय यादिवशी कडूनिंबाच्या कोवळ्या पानांची गोड- कडवट चटणीही करण्यात येते...आणि आवर्जून ती पानात वाढण्यात येते...
4 / 10
४. ही चटणी सगळ्यांनी खायचीच... असे आदेश आजी किंवा आजोबांकडून घरातल्या प्रत्येक सदस्याला दिला जातो.. वर्षाच्या सुरुवातीला कडूनिंबाची चटणी खाल्ली की आपण वर्षभर आजारी पडत नाही... हे त्यामागचं कारणही सांगितलं जातं.. पण खरंच असं असतं का?
5 / 10
५. कडुनिंबाची पानं, फुलं, फळं, मुळं आणि खोड हे सर्वच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.
6 / 10
६. कडुनिंबाच्या पानांमुळे पोटातील जंत दूर होतात. पोटाच्या इतरही समस्यांवर ते उपयुक्त ठरते. पोटाचे आरोग्य सुधारले तर आपोआपच तब्येत सुधारते.
7 / 10
७. गुढीपाडव्याच्या आसपास वातावरणात खूप बदल झालेला असतो. या नव्या बदलाशी जुळवून घेताना रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून यादिवशी आवर्जून कडुनिंबाचा पाला खायला देतात. यामुळे गोवर- कांजण्या यासारख्या उन्हाळी आजारांविरूद्ध लढण्याची ताकद मिळते.
8 / 10
८. केस आणि त्वचेसंदर्भातील तक्रारींसाठीही कडुनिंब गुणकारी मानला जातो.
9 / 10
९. कडुनिंबाच्या कोवळ्या पानात भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स, ॲण्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
10 / 10
१०. कडुनिंबाची चटणी करण्यासाठी कोवळी पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यात थोडासा चिंचेचा कोळ, थाेडासा गुळ, हिंग, जीरेपूड, भिजवून वाटलेली हरबरा डाळ हे सगळं साहित्य टाका. हे सगळे साहित्य खलबत्त्यात कुटून घ्या किंवा वाटून घ्या. चिंच- गुळामुळे चटणीचा कडवटपणा जरा कमी होईल.
टॅग्स : गुढीपाडवावेट लॉस टिप्सआरोग्यकेसांची काळजीत्वचेची काळजी