Join us
Daily Top 2 Weekly Top 5

५ मिनिटांत ५ व्यायाम, ब्रा फॅट कमी करण्यासाठी सकाळी करा 'एवढंच', पाठीवरचे फॅट्सही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2026 18:00 IST

1 / 7
अनेकदा आपण पोटाचा घेर किंवा मांड्यांची चरबी कमी करण्यावर भर देतो, पण पाठीवर साचलेल्या चरबीकडे कायम दुर्लक्ष केले जाते. महिलांमध्ये ब्रा लाईनच्या आसपास साचलेली चरबी केवळ बेढब दिसत नाही, तर यामुळे आवडीचे फिटिंगचे कपडे, ब्लाऊज किंवा बॅकलेस ड्रेसेस घालताना आत्मविश्वासही कमी होतो. शरीराच्या या भागातील स्नायू कमी वापरले गेल्यामुळे तिथे चरबी झपाट्याने साचते. (Best exercises for back fat and posture)
2 / 7
पाठीवर साचलेली चरबी कमी करण्यासाठी आपल्याला तासनतास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. सकाळच्या घाईच्या वेळेतून ५ मिनिटे काढून ५ व्यायाम केल्यास पाठीचे स्नायू टोन्ड होतात आणि चरबी वेगाने वितळण्यास मदत होईल. पाहूया काही सोपे व्यायाम (Morning routine to burn back fat)
3 / 7
कॅट-काऊ स्ट्रेच गुडघे आणि हातांवर वाकून हा व्यायाम केला जातो. यासाठी श्वास घेताना पाठ खाली झुकवावी आणि श्वास सोडताना पाठ वरच्या बाजूला मान करावी. यामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता मिळते आणि स्नायूंवर ताण येतो.
4 / 7
सुपरमॅन पोझ पोटावर पालथे झोपून दोन्ही हात आणि पाय हवेत एकाच वेळी वर उचला. ही स्थिती पाठीच्या खालच्या आणि वरच्या भागातील स्नायूंवर थेट काम करते. हे 'ब्रा फॅट' कमी करण्यासाठी चांगला मार्ग आहे.
5 / 7
आर्म सर्कल्स दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ पसरवा आणि हात गोलाकार फिरवा. ३० सेकंद सरळ आणि ३० सेकंद उलट दिशेने फिरवा. यामुळे खांद्यासह पाठीच्या वरच्या बाजूची चरबी कमी होते.
6 / 7
कोब्रा प्रोझ पोटावर झोपून हातांच्या सहाय्याने शरीराचा पुढचा भाग वर उचला. यामुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येतो आणि तिथली चरबी वितळण्यास सुरुवात होते.
7 / 7
वॉल पुश-अप्स आपल्या जमिनीवर पुश-अप्स करणं कठीण जात असेल तर भिंतीचा आधार घेऊन उभे राहून पुश-अप्स करा. हे केल्यामुळे पाठीचे आणि हातांचे स्नायू घट्ट होतात ज्यामुळे बॉडीला सुबक आकार मिळतो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सआरोग्यव्यायाम