भात खाऊन वजन वाढण्याचं टेन्शन? 'या ' पद्धतीने पोटभर भात खा, वजन वाढणार नाही
Updated:April 10, 2026 13:20 IST2026-04-10T13:14:38+5:302026-04-10T13:20:28+5:30

काही लोकांना भात खूप आवडतो, पण तरीही ते भात खाणं टाळतात. कारण भात खाऊन वजन वाढण्याची भीती त्यांना वाटत असते.
पण आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की तुम्ही जर योग्य पद्धतीने भात खाल्ला तर मात्र तुमचं वजन वाढणार नाही. त्यासाठी काय करावं याविषयीच्या टिप्स आहारतज्ज्ञांनी kavita.devgan या इंस्टाग्राम पेजवर शेअर केल्या आहेत.
भात शिजवण्यापुर्वी त्यात थोडे फॅट्स घाला. म्हणजेच भात करण्यासाठी तांदुळात पाणी घातलं की सगळ्यात आधी त्यात तूप घाला आणि मग भात शिजवायला ठेवा. यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही.
आहारतज्ज्ञांच्या मते गरमागरम भात कधीही खाऊ नका. भात शिजल्यानंतर तो थंड होऊ द्या. त्यानंतर तो काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि नंतर तो खा. यामुळे तो पचायला जास्त चांगला होतो.
जेवणाची सुरुवात कधीही भाताने करू नका. सगळ्यात आधी फायबर खा. यामध्ये तुम्ही सलाड, कोशिंबीर खाऊ शकता. त्यानंतर मग प्रोटीन्स घ्या. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डाळी, दही, कडधान्ये असं घेऊ शकता. या पदार्थांसोबत भात खा. यामुळे आपोआपच फायबर, प्रोटीन्स पोटात जास्त प्रमाणात जातील आणि भात खाणं कंट्रोलमध्ये येईल.
या पद्धतीने भात खाल्ला तर वजन वाढणार नाही. काही दिवस हा प्रयोग करून पाहा असं आहारतज्ज्ञ सांगतात.