चपळ व्हायचं - ताकद हवी तर पाहा खजूर खाण्याची योग्य पद्धत, अशक्तपणा- थकवा जाईल पळून कायमचा..
Updated:February 17, 2026 12:41 IST2026-02-17T12:35:24+5:302026-02-17T12:41:29+5:30

९० टक्के लोकांना खजूर खाण्याची योग्य पद्धत माहितीच नाही. म्हणूनच त्याचे म्हणावे तसे लाभ शरीराला होत नाहीत.
खजूरामध्ये लोह, नॅचरल शुगर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अंगातला थकवा किंवा अशक्तपणा घालविण्यासाठी खजूर खाणे अतिशय उपयुक्त ठरते.
पायात गोळे येणे, मासिक पाळीमध्ये त्रास होणे, पाठ- कंबर गळून जाणे असे त्रास कमी करण्यासाठीही खजूर खाणे फायेशीर ठरते. कारण त्यामधून भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम मिळते.
खजूर खाण्याचे पुरेपूर फायदे शरीराला मिळवून द्यायचे असतील तर ते योग्य पद्धतीने खायला हवे. त्यासाठी खजूर मधोमध कापा आणि त्याच्यातली बी काढून घ्या. यानंतर त्यामध्ये थोडासा मध घाला.
त्यानंतर त्यावर चिमूटभर सैंधव मीठ घाला. आता या पद्धतीने ७ दिवस नियमितपणे खजूर खाऊन पाहा.
ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, त्यांचा हा त्रास पुर्णपणे कमी होईल. कारण खजूर, मध आणि सैंधव मीठ हे कॉम्बिनेशन पचनक्रिया, मेटाबॉलिझम चांगले करण्यास मदत करते.
ज्यांना नेहमीच बॉडी पेनचा त्रास होतो, त्यांच्यासाठीही या पद्धतीने खजूर खाणे खूप फायद्याचे ठरते. हा उपाय योग अभ्यासकांनी humyog या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.