नारळ पाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात शरीरासाठी सर्वात चांगलं काय? कधी, काय प्यावं, पाहा
Updated:March 11, 2026 20:51 IST2026-03-11T20:40:24+5:302026-03-11T20:51:46+5:30
Coconut water Vs lemon water : नारळ पाण्यातील पोषक तत्वांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि सुरकुत्या कमी होतात.

लिंबू पाणी हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. कारण यात कॅलरीज नगण्य असतात आणि ते मेटाबॉलिझ्म वाढतो. (Coconut water or lemon water what is best for the body in summer)
लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रुक्त शुद्ध करण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचेवर चमक येते.
लिंबू पाण्यामधून भरपूर प्रमाणात व्हिटामीन सी मिळते जे आपली इम्यूनिटी वाढवते.
नारळपाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्सचा उत्तम स्त्रोत आहे. जेव्हा शरीरातील पाणी कमी होते तेव्हा नारळपाणी झटपट ऊर्जा देते.
नारळ पाण्यात भरपूर पोटॅशियम असते जे शरीरातील अतिरिक्त मीठ बाहेर काढून चेहर्याची सूज कमी करते.
नारळ पाण्यातील पोषक तत्वांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि सुरकुत्या कमी होतात.
जेवणानंतर लिंबू पाणी प्यायल्यानं पचन सुधारते तर रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यानं पित्ताचा त्रास कमी होतो.
जर तुमचं ध्येय फॅट बर्निंग असेल तर लिंबू पाणी निवडा आणि जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, त्वचा तजेलदार करायची असेल तर नारळ पाणी उत्तम ठरते.