विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

Updated:July 19, 2025 16:07 IST2025-07-19T12:35:09+5:302025-07-19T16:07:38+5:30

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

वजन कमी कसं करावं हा प्रश्न तुमच्यासमोरही असेल तर सेलिब्रिटींकडून तुम्ही काही टिप्स नक्कीच घेऊ शकता..

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने ४ महिन्यात तब्बल २५ किलो वजन कमी केलं. समतोल आहार घेणे, साखर, जंकफूड आणि रिफाईंड कार्ब्स पुर्णपणे बंद करणं, फळं, भाज्या आणि प्रोटीन्सवर जास्तीतजास्त भर हे तिचं वेटलॉस सिक्रेट आहे. तिच्या दिवसाची सुरुवात ॲलोव्हेरा ज्यूस पिऊन व्हायची. यासोबतच ती नियमितपणे व्यायामही करायची.

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

कपिल शर्मानेही ११ किलो वजन कमी केलं. घरचं जेवण करण्यावर त्याने भर दिला. त्यासोबतच अल्कोहोल, कॉफी पुर्णपणे बंद केलं आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठीही विशेष मेहनत घेतली.

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

करण जोहरने ओझेम्पिक डाएट करून वजन कमी केलं. करण जोहर म्हणतो वेटलॉससाठी तुम्ही जे काही प्रयत्न कराल, त्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे.

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

भारती सिंह हिने १० महिन्यात १६ किलाे वजन कमी केलं. ती म्हणते तिच्याकडून खूप स्ट्रिक्ट डाएट होत नाही. पण घरचं अन्न खाणे, जे काही खाते ते खूप प्रमाणात खाणे आणि संध्याकाळी ७ नंतर काहीही खाणे पुर्णपणे बंद करणे हे नियम तिने पाळले.

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

विद्या बालननेही कमालीचं वजन घटवलं. त्यासाठी तिने ॲण्टी इन्फ्लामेटरी पदार्थ खाण्यास प्राधान्य दिलं.

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

काही वर्षांपुर्वी गोल गुबगुबीत असणारे राम कपूर आता एकदमच स्लिम झाले आहेत. त्यांनी १८ महिन्यात तब्बल ५५ किलो वजन कमी केलं. इंटरमिटंट फास्टिंग करून त्यांना हा वेटलॉस करता आता. १६ तास ते अजिबात काहीही खायचे नाहीत. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, गोड पदार्थ, कार्ब्स, तेल खाणं त्यांनी बंद केलं होतं.

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

पण सेलिब्रिटींनी जे काही केलं आहे ते तसंच्या तसं फॉलो करू नका. कारण तुमचं वय, वजन, कामाचं स्वरुप, आहार या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आहारतज्ज्ञांचा किंवा डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊनच वजन कमी करावं.