1 / 7वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत डाएट करणं देखील जास्त महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी चपाती आणि भात खाणे बंद करतात. यामुळे वजन वाढतं असं अनेकांच मत देखील आहे. पण तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी चपाती खाणं बंद करण्यापेक्षा योग्य पीठाची निवड केल्यास वजन नियंत्रणात राहिल.(High protein chapati flour)2 / 7वेटलॉससाठी आहारात कोणती चपाती असायला हवी. तिची प्रमाण किती असायला हवं, जाणून घेऊया.(Weight loss flour) 3 / 7देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये चपाती आवडीने खाल्ली जाते. काही ठिकाणी बाजरी आणि मक्याची देखील चपाती-भाकरी खातात. गव्हाच्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्व बी आणि खनिजे असतात. जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. 4 / 7गव्हाच्या चपातीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढते. तसेच मधुमेह, थायरॉईड असणाऱ्या लोकांनी गव्हाच्या पीठासोबत इतर पीठ देखील मिसळून त्याची चपाती खाऊ शकता. 5 / 7बाजरीची भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. यात लोह भरपूर असते. ज्यामुळे अशक्तपणा येत नाही. हिवाळ्यात या भाकरीचे सेवन केल्यास शरीराला ऊब मिळते. उन्हाळ्यात बाजरीचे सेवन मर्यादेत करायला हवं. वजन कमी करण्यासाठी दुपारी १ भाकरी खावी.6 / 7ज्वारीची भाकरी कमी प्रमाणात खाल्ली जाते. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये ज्वारीचे सेवन केले जाते. ही ग्लुटेन- फ्री असते. ज्यामुळे ती अधिक पौष्टिक बनते. यात कॅलरीज देखील कमी असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. 7 / 7नाचणीची भाकरी पित्त संतुलित करण्यासाठी खाल्ली जाते. पित्तदोष वाढला असेल तर ही भाकरी खाऊ शकता. यात कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. ज्यामुळे पचन चांगले होते. हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. तसेच वजनही नियंत्रणात राहते.