Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फक्त 'हे' पदार्थ खाणं बंद करा, २ आठवड्यात वजन घटून दिसू लागाल स्लिम-काही दिवसात व्हाल चवळीची शेंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 13:49 IST

1 / 7
वजन वाढण्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे चुकीचा आहार. जर आहारात तुम्ही योग्य ते बदल केले आणि काही पदार्थ खाणं पूर्णपणे टाळलं तर नक्कीच वजन कमी होऊ शकतं.. (avoid these food items for fast weight loss)
2 / 7
त्यापैकी पहिला पदार्थ आहे चिप्स किंवा तसेच बाजारात मिळणारे काही पॅकफूड. या पदार्थांमध्ये खूप जास्त मीठ असतं. हे मीठ शरीरात पाणी धरून ठेवतं आणि त्यामुळे शरीरावर सूज येऊन वजन वाढतं.(food responsible for weight gain)
3 / 7
दुसरा पदार्थ आहे बिस्किटं. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच बिस्किटे खाऊन होते. ते अतिशय चुकीचं आहे. बिस्किटांमध्ये मैदा आणि साखर यांचं प्रमाण खूप जास्त असतं. पोटाचा घेर वाढविण्यासाठी बिस्किटं खूप जबाबदार आहेत.
4 / 7
बाजारात मिळणारे एनर्जी ड्रिंक किंवा पॅक सरबतं देखील अजिबात आरोग्यदायी नाहीत. त्यांच्यामध्ये खूप जास्त शुगर असते. त्यामुळे अगदी थोडा ज्यूस प्यायला तरी त्यातून भरपूर कॅलरीज पोटात जातात आणि वजन वाढण्यास मदतच होते.
5 / 7
ब्रेड किंवा पाव खाणंही वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. ब्रेडमध्ये खूप जास्त मैदा असतो. सॅण्डविच हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. त्यामुळे तो नाश्त्यामध्ये सर्रास खाल्ला जातो. सॅण्डविचमध्ये भाज्या असल्या तरी ब्रेड असतोच. त्यामुळे त्याच्यावर ताव मारण्याआधी विचार करा. मैद्यामुळे वजन खूप वाढतं. ब्राऊन ब्रेड आपण हेल्दी समजून खातो, पण त्यातही मैदा असतोच. त्यामुळे तो खाणंही टाळायला हवं. ही माहिती तज्ज्ञांनी yogawithengineer या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
6 / 7
वजन कमी करायचं असेल तर वरील पदार्थ खाणं तर टाळायलाच हवं पण त्यासोबतच आहारातलं प्रोटीन्स आणि फायबर यांचं प्रमाण वाढवायला हवं.
7 / 7
याशिवाय रोजचा व्यायामही खूप महत्त्वाचा आहे. आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने झाल्या तर वजन नक्कीच आटोक्यात राहील.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्नव्यायाम