जेवणानंतर चिमूटभर तरी बडीशेप खायलाच पाहिजे, कारण.... पोटाचे डॉक्टर सांगतात ४ जबरदस्त फायदे
Updated:January 27, 2025 11:50 IST2025-01-27T11:43:47+5:302025-01-27T11:50:19+5:30

बरेच जण जेवण झाल्यानंतर अगदी न चुकता थोडीशी तरी बडीशेप हातावर घेऊन तोंडात टाकतातच. बडीशेपची चव आवडते म्हणून येता- जाता चमचा- चमचा बडीशेप खाणारेही खूप आहेत. बडीशेपचा एवढा अतिरेक करणं योग्य नाही. पण तरीही प्रत्येक जेवणानंतर थोडी का होईना पण बडीशेप खाणं खूप गरजेचं आहे, असं डॉक्टर सांगतात.( why it is important to eat fennel seeds after every meal?)
जेवल्यानंतर बडीशेप का खायला पाहिजे याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ पोटाच्या डॉक्टरांनी doctor.sethi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले फायदे पाहूया..(amazing benefits of eating fennel seeds daily)
बडीशेप जेव्हा आपण चावून चावून खातो तेव्हा त्यातून पचनासाठी उपयुक्त ठरणारे असे काही एन्झाईम्स बाहेर पडतात ज्यामुळे ब्लोटींग, पोट गुबारण्याचा त्रास होत नाही.
काही जणांना कायमच तोंडाची दुर्गंधी येण्याचा त्रास असतो. जेवल्यानंतर जर नियमितपणे चमचाभर बडीशेप खाऊन बारीक चावली तर त्यामुळे तोंडाची दुर्गंधी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
बडीशेप खाल्ल्यामुळे ॲसिडीटीचा त्रास होत नाही. त्यामुळे ज्यांना वारंवार ॲसिडीटी होत असते, छातीत जळजळ होत असते त्यांनी नियमितपणे बडीशेप खावी.
पोटाचे स्नायू मोकळे होण्यासाठीही बडीशेपेतून मिळणारे डायजेस्टीव्ह एन्झाईम्स खप उपयोगी ठरतात. यामुळे पोटात मुरड येणे, आकडा येणे असा त्रास हाेत नाही.