1 / 9बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते. त्यामुळे मग त्यांना थकवा येणे, अशक्तपणा, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, हातापायांना मुंग्या येणे, चीडचीड होणे असे कित्येक वेगवेगळे त्रास होत असतात.(how to get rid of vitamin b 12 deficiency?)2 / 9मांसाहारी पदार्थांमधूनच व्हिटॅमिन B12 जास्त प्रमाणात मिळतं हे अगदी खरं आहे. पण काही शाकाहारी पदार्थही आहेत जे तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ले तर नक्कीच त्यातून तुम्हाला B12 मिळू शकतं, असं डॉक्टर सांगतात. ते पदार्थ नेमके कोणते याविषयी आहारतज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे.(7 veg food for improving vitamin b 12 level in your body)3 / 9त्यापैकी पहिला पदार्थ आहे मशरूम. हा व्हिटॅमिन बी १२ चा एक उत्तम स्त्राेत मानला जातो. (veg super food for increasing vitamin b 12)4 / 9स्विस, मोझेरेला या प्रकारच्या चीजमधूनही उत्तम प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ मिळतं. त्यामुळे पराठा, सॅण्डविज अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून ते नियमितपणे खा.5 / 9दही हा देखील व्हिटॅमिन बी १२ चा एक चांगला स्त्रोत आहे.6 / 9शाकाहारी लोकांना त्यांच्या शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढवायचं असेल तर त्यासाठी त्यांनी नियमितपणे पनीर खाणं खूप फायदेशीर ठरतं. 7 / 9केळी नियमितपणे खा. त्यांच्यातून थेट बी १२ मिळत नाही. पण केळीतून मिळणारं बी ६ इतर अन्नपदार्थांमधून मिळणारं व्हिटॅमिन बी १२ शरीरात शोषून घेण्यासाठी उपयुक्त ठरतं.8 / 9केळीप्रमाणेच सफरचंदामधूनही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ६ मिळतं.9 / 9प्रियांशी सांगतात की बी १२ कमी असेल तर मन एकाग्र होत नाही किंवा कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. डोकं जड पडल्यासारखं होतं. हा मेंदूशी संबंधित त्रास कमी करण्यासाठी ब्लू बेरी उपयुक्त ठरू शकतात. कारण त्यांच्यातून असे काही घटक मिळतात जे मेंदू ॲक्टीव ठेवण्यास मदत करतात तसेच पचन क्रिया सुधारण्यासही उपयुक्त ठरतात.