७ दिवस ७ ड्रिंक्स, चेहर्यावर येईल चमक, केसही गळणं कमी-तब्येतीसाठी फार गुणकारी
Updated:February 6, 2025 12:26 IST2025-02-06T12:05:27+5:302025-02-06T12:26:33+5:30
7 days for 7 drinks, your face will glow, hair loss will stop : आठवड्याच्या सातही दिवसांसाठी पौष्टिक पेये.

विविध फॅटबर्निंग ड्रिंक्सबद्दल आपण ऐकत असतो. महाग पावडर विकत आणून ते पेय आपण तयार करतो.
घरी असलेल्या साध्या पदार्थांपासून विकतच्या पावडरींपेक्षा गुणकारी पेये तयार करता येतात.
आठवड्यातले सात दिवस सात वेगवेगळ्या पेयांचे सेवन करा. प्रत्येक पेय आरोग्यासाठी चांगलं आहे.
सकाळी रिकाम्या पोटी प्या. वजन कमी होण्यातही मदत करतील ही सर्वच पेये.
१. पाणी उकळून घ्या. त्यात मध घाला. मध पाणी घशासाठी चांगले. वजन कमी करण्यातही मदत करते.
२. आपल्याला लिंबू पाण्याचे महत्त्व तर माहितीच आहे. गरम पाण्यात एक लिंबू पिळा. आणि प्या. दिवसभरासाठीचा जीवनसत्त्वांचा कोटा भरून जाईल.
३. हळद गरम पाण्यात घालून प्या. हळद त्वचेसाठी चांगली. तसेच हळद रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
४. गवती चहा आणि आलं एकत्र पाण्यात उकळा. आणि ते पाणी प्या. गवती चहा केसांसाठी चांगला. आलं पचनासाठी खुप चांगलं.
५. धने-जीऱ्याची पावडर उकळून ते पाणी सकाळी प्या. पोट साफ होते. जर काही पचनाचा आजार असेल तर तो निघून जाईल. वजन कमी होण्यासाठी मदत होईल.
६. दालचिनीची पावडर पाण्यात उकळा. याचे अनेक औषधी फायदे आहेत. शरीरासाठी हे पाणी फार गुणकारी आहे.
७. जास्वंदीचे फुल पाण्यात उकळून ते पाणी प्या. त्वचेसाठी आणि केसांसाठी ते फायदेशीर आहे. तसेच वजन कमी करण्यासाठीही उपयोगी आहे.