उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

Updated:April 23, 2025 09:20 IST2025-04-23T09:16:45+5:302025-04-23T09:20:02+5:30

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

टरबूज, खरबूज ही अस्सल उन्हाळी फळं. यात बहुतांश जणांना टरबूज आवडतं. पण खरबुजाकडे मात्र पाठ फिरवली जाते. पण टरबुजाएवढेच खरबूजसुद्धा गुणकारी असून काही विशिष्ट आजारांमध्ये तर ते अतिशय गुणकारी ठरते.

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

खरबूज हे थंड फळ आहे. त्यामुळे या दिवसांत होणारी पोटाची आग कमी करून शरीर थंड ठेवण्यासाठी ते उपयोगी ठरतं.

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना उन्हाळ्याच्या दिवसांत खूप तगमग होतं. त्यांची अस्वस्थता कमी करण्यासाठी त्यांनी खरबूज खायला हवं, अशी माहिती डॉ. सिराज सिद्दीकी यांनी दिलेली माहिती न्यूज १८ ने प्रकाशित केली आहे. खरबूज नियमितपणे खाल्ल्यामुळे बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

खरबुजामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पण ज्या लोकांना किडनीसंबंधित त्रास असतो त्यांनी १५० ते २०० ग्रॅम एवढ्याच प्रमाणात टरबूज खावं. त्यापेक्षा अधिक खाणं त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं नाही.

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

खरबूजमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात होणारा डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी खरबूज खाण्याचा सल्ला दिला जातो.

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

खरबुजामध्ये प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट्स, फॉस्फरस, लोह, फाइबर, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम यासोबतच इतरही कित्येक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही खरबूज उपयुक्त ठरतं.