1 / 7वजन कमी करायचं असेल तर या पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा.(5 tips for fast weight loss)2 / 7बऱ्याचदा असं होतं की वजन कमी करण्याच्या नादात अनेकांचा फिटनेस बिघडतो. खूप थकवा येतो. असं काही होऊ न देता वजन कमी करायचं असेल तर या काही गोष्टी पुढचे काही दिवस करून पाहा..(healthy way for weight loss)3 / 7डॉ. आशिष गौरव यांनी जनसत्ता टाईम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार वजन कमी करण्याच्या नादात कोणतेही जेवण किंवा नाश्ता चुकवू नका. नाश्ता आणि दोन्ही वेळचे जेवण वेळेवर घ्या पण आहार मात्र मर्यादित ठेवा.4 / 7वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्यायाम करण्यावरही भर द्या. दररोज २० ते ३० मिनिटांसाठी कोणता ना कोणता व्यायाम नक्की करा.5 / 7वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणंही खूप गरजेचं आहे. कारण पुरेशी झोप मिळाली तर शरीरातले हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी खूप मदत होते.6 / 7दोन जेवणांच्या मधल्या वेळेत जर भूक लागली तर पाणी, ताक, बिनसाखरेचा पातळ चहा असे पदार्थ खा. लाह्या, मुरमुरेही खाऊ शकता. पण जंकफूड खाणे मात्र टाळा.7 / 7जेवणाच्या आधी फळं, सलाड, कडधान्ये खाण्यावर भर द्या. यातून भरपूर फायबर मिळतात. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जेवण कमी जाते.