Join us
Daily Top 2 Weekly Top 5

४० रुपये डझन केळी देते महागडे एनर्जी ड्रिंक आणि सप्लिमेण्टपेक्षा जास्त ताकद, पाहा रोज १ केळ खाण्याचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2025 15:38 IST

1 / 7
बारा महिने अगदी स्वस्तात मस्त मिळणारं फळ म्हणजे केळी. पण त्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो आणि महागड्या विदेशी फळांच्या नादी लागतो. पण तेच केळ आपल्याला खूप आरोग्यदायी फायदे देतं.
2 / 7
केळीमध्ये असणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाबाला नैसर्गिकपणे नियंत्रित ठेवतात आणि हृदयाच्या स्नायूंना मजबूत करतात.
3 / 7
केळीमधले घटक शरीरातले इलेक्ट्रोलाईट नैसर्गिकपणे बॅलेन्स करतात. त्यामुळे जे लोक नियमितपणे जीम किंवा व्यायाम करतात, त्यांना भरपूर एनर्जी देण्यासाठी केळी उपयोगी ठरतात.
4 / 7
केळी आपल्या शरीरासाठी एखाद्या एनर्जी डिंकप्रमाणे काम करते. त्यामुळे ज्यांना नेहमीच गळून गेल्यासारखं, अशक्त वाटतं त्यांनी नियमितपणे १ ते २ केळी दरदिवशी खायला हवीत.
5 / 7
केळीमध्ये असणारे ट्रिप्टोफॅन आणि व्हिटॅमिन बी ६ स्ट्रेस कमी करून मूड फ्रेश ठेवण्यास मदत करतात.
6 / 7
केळीमध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर दोन्हीही असतात. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर रक्तातील साखर एकदम वाढत नाही. तसेच केळी खाल्ल्यानंतर मिळणारी उर्जा पुढे बराच वेळ टिकून राहाते.
7 / 7
त्यामुळे रोज २ केळी खावीत असा सल्ला डॉक्टरांनी dr.rohit.sane या इंस्टाग्राम पेजवर दिला आहे. पण तरीही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. प्रत्येकालाच राेज २ केळी खाणं सहन होईलच असं नाही. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापुर्वी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स : वेट लॉस टिप्सकेळीफळेहृदयरोग