Join us
Daily Top 2 Weekly Top 5

वर्किंग वुमनसाठी ऋजुता दिवेकर सांगतात ३ खास गोष्टी, न थकता नेहमीच राहाल ॲक्टीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2026 09:40 IST

1 / 6
घरातल्या जबाबदाऱ्या आणि ऑफिसची कामं सांभाळता सांभाळता वर्किंग वुमनची खरोखरच खूप दमछाक होत असते. दोन्हीकडे त्यांना तेवढ्याच सक्षमपणे वेगवेगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात.
2 / 6
या दोन्ही ठिकाणी धावून धावून कधीतरी दमछाक होतेच. पण थकून भागणार नसतं. त्यामुळे त्यांनी नेहमीच ॲक्टीव्ह राहणंही गरजेचं असतं.
3 / 6
म्हणूनच सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी वर्किंग वुमनसाठी काही साध्या सोप्या टिप्स दिल्या आहेत. त्या ३ गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या तरी खूप छान बदल जाणवेल.
4 / 6
यामध्ये त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्यापुर्वी जेव्हा थोडीशी भूक लागते तेव्हा त्यावेळी खजूर खा. खजूरमध्ये नॅचरल साखर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे लगेच एनर्जी मिळते. शिवाय त्यातून चांगल्या प्रमाणात फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी देखील मिळतं.
5 / 6
दुसरी गोष्ट म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला आणि संध्याकाळी फक्त ५- ५ स्क्वॅट्स जरूर करा. कारण दिवसभर बैठं काम असल्याने शरीर आखडून जातं. रक्ताभिसरण हळूवार होतं. मेटाबॉलिझमही कमी झालेलं असतं. हे सगळं सुरळीत होण्यासाठी स्क्वॅट्स करणं फायदेशीर ठरतं.
6 / 6
आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या जेवणाचा शेवट २ काजू खाऊन करा. त्यातून हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे पचन चांगलं होतं. झोप चांगली येते आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगल्या एनर्जीने होण्यासाठी काजू फायदेशीर ठरतात.
टॅग्स : वेट लॉस टिप्सअन्नव्यायामआरोग्यमहिला