कणकेमध्ये 'हा' पांढरा पदार्थ मिसळून करा पोळ्या, १ महिन्यात सुटलेलं पोट उतरून वजन घटेल
Updated:February 9, 2025 09:15 IST2025-02-09T09:14:47+5:302025-02-09T09:15:02+5:30

वाढतं वजन कमी कसं करायचं, सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय उपाय करायचा अशी समस्या सध्या खूप लोकांना छळत आहे.(1 simple trick for fast weight loss)
तुम्हीही या समस्येने हैराण असाल तर अगदी लगेच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या पोळ्यांसाठी कणिक मळताना त्यात एक खास पदार्थ घालायचा आहे. तो पदार्थ आहे इसबगोल. इसबगोल ही एक औषधी वनस्पती असून ती वाळवून तिचं थोडं पीठ करा आणि ते पीठ तुमच्या कणकेमध्ये घालून त्याच्या पोळ्या करा.
इसबगोल या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे कॅलरी लवकर बर्न हाेऊन वजन कमी होण्यास फायदा होतो.
रोजच्या तुमच्या कणकेमध्ये एक ते दोन टेबलस्पून या प्रमाणात इसबगोल घालावे. अशा पद्धतीच्या पोळ्या जर तुम्ही महिनाभर खाल्ल्या तर वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असं टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तात सांगितलं आहे. याविषयी तज्ज्ञांकडून योग्य तो सल्ला घ्यावा आणि मगच अशा पद्धतीच्या पोळ्या किंवा चपात्या खाव्या..