Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्न महिन्याभरावर आलं, पण ढेरी कमीच होत नाही? ६ टिप्स - लग्नाच्या प्रत्येक आऊटफिट्समध्ये दिसाल सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2025 16:17 IST

1 / 9
लग्न जवळ आलंय आणि खरेदी, तयारी, समारंभ यामध्ये आपण शक्यतो खूपच(how to reduce belly fat naturally) बिझी असतो. पण, खास लग्नाचा ड्रेस किंवा लेहेंगा घातल्यावर 'परफेक्ट' दिसायचं असेल तर पोटावरची हट्टी चरबी कमी करणं हे शेवटच्या क्षणी मोठे अवघडच काम वाटतं... शेवटचा महिना उरला असताना, 'बेली फॅट काही केल्या कमी होत नाहीये' अशी चिंता अनेकजणींना सतावते. आता कमी वेळात, शरीराला फारसा थकवा न देता, जलद गतीने बेली फॅट्स कमी करण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात.
2 / 9
लग्नाला फक्त महिना बाकी असताना बेली फॅट कमी करण्यासाठी, कठोर डायटिंग नाही, तर 'स्मार्ट प्लॅनिंग' करण्याची गरज असते. या स्मार्ट प्लॅनिंगमध्ये आहार बदल, विशिष्ट घरगुती उपाय आणि पोटाची चरबी जलद गतीने जाळणारे सोपे व्यायाम यांचा समावेश आहे. हा 'इमर्जन्सी प्लॅन' तुम्हाला तुमच्या लग्नाच्या दिवशी आत्मविश्वासाने आणि फिट दिसण्यासाठी नक्कीच मदत करेल.
3 / 9
सेलिब्रिटी डाएटिशियन आणि वेलनेस कोच सिमरत कथूरिया यांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही जिमला न जाताही आरोग्यपूर्ण पद्धतीने महिन्याभरात वजन आणि बेली फॅट्स कमी करू शकता.
4 / 9
दिवसभरातील तुमच्या जेवणाची वेळ १० तासांची ठेवा. उदाहरणार्थ: सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत. यामुळे पचन सुधारते, अनावश्यक स्नॅकिंग थांबते आणि उशिरा रात्री जेवल्यामुळे होणारी ब्लोटिंग अशा समस्या होत नाही. उशिरा रात्री जेवण केल्याने झोप खराब होते, स्ट्रेस वाढतो आणि शरीरात पाणी साठून राहते, ज्यामुळे चेहरा आणि पोट सुजलेले दिसू लागते. शक्यतो दिवसभरातील खाण्याच्या वेळा निश्चित करा आणि त्या पाळा दररोज योग्य या ठरवलेल्याच वेळी खाण्याचा प्रयत्न करा.
5 / 9
पुढील ३० दिवसांसाठी हलका पण संतुलित आहार घ्या. तुमच्या प्लेटमध्ये खालीलप्रमाणे प्रमाण आहार असावा. अर्ध्या प्लेटमध्ये भाज्या, एक चतुर्थांश प्रोटीनयुक्त पदार्थ, एक चतुर्थांश कार्ब्स, एक चमचा हेल्दी फॅटस असलेले पदार्थ खावेत. भाज्यांमध्ये, भोपळा, पालक, ब्रोकोली, गाजर, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. प्रोटीनसाठी पनीर, दही, डाळी यांसारखे पदार्थ घ्या. भरड धान्यांचा देखील तितकाच समावेश करावा. फॅटसाठी तूप, नारळ किंवा ५ ते ६ ड्रायफ्रुटस यांचा समावेश करा.
6 / 9
ब्लोटिंगची समस्या कमी झाल्यास वेटलॉस होण्यास मदतच होते. रोज जिरे आणि बडीशेपचे पाणी प्या. आहारात दही किंवा ताक यांसारखे प्रोबायोटिक्स समाविष्ट करा. पॅकेज्ड फूड्स खाण्याचे प्रमाण कमी करा. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मीठाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा किंवा मर्यादित प्रमाणात खा. चहा आणि कॉफी दिवसभरात फक्त दोनच कप प्यावी.
7 / 9
लग्नाच्या धावपळीत आपण अनेकदा पाणी पिणेच विसरतो , ज्यामुळे चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा. रोज १ लिटर साधे पाणी, १ लिटर पुदिना किंवा लिंबू मिसळलेले पाणी, जवळपास ५०० मिली हर्बल टी (उदा. आले, तुळस, कॅमोमाईल) यामुळे फूड क्रेविंग्स, सूज आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे देखील कमी होतात.
8 / 9
अतिशय हेवी वर्कआउटची गरज नाही, फक्त एक्सरसाईजचे एक सोपे रूटीन पाळा. यामध्ये रोज ३० मिनिटे वेगाने चालणे, १५ मिनिटे स्ट्रेंथ ट्रेनिंग (स्क्वॅट, लंज आणि प्लँक), १० मिनिटे स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहते.
9 / 9
लग्नाचा स्ट्रेस अनेकदा जास्त खाणे, पोट फुगणे आणि पोटदुखीचे कारण बनतो. त्यामुळे रोज १० मिनिटे डीप ब्रीदिंग (Deep Breathing) करा, ५ मिनिटे ध्यान करा. ७ ते ८ तासांची झोप घ्या. झोपण्यापूर्वी ३० मिनिटे तुमचा फोन दूर ठेवा. या सवयी चयापचय क्रियेचा वेग सुधारून शरीराला शांत आणि संतुलित ठेवतात.
टॅग्स : शुभविवाहवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहोम रेमेडी