1 / 6अथक प्रयत्नांनी भारतीय महिला क्रिकेट संघाने आपली गुणवत्ता मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही सिध्द केली. महिला क्रिकेटला भातूकली म्हणणाऱ्या अनेकांची तोंड गप्प करत या खेळाडूंनी स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. भारतीयांच्या मानावर नावं कोरणाऱ्या या खेळाडूंच्या अंगावरचे टॅटूही त्यांच्या शक्तीचे आणि सबल इच्छेची कहाणी सांगतात.2 / 6गेल्या काही वर्षात फार लोकप्रिय ठरलेले नाव म्हणजे दीप्ती शर्मा. दिप्ती भारताची ऑलराऊंडर खेळाडू असून एक मजबूत प्लेअर आहे. तिच्या हातावर हनुमानाचा टॅटू आणि 'जय श्रीराम' हे ब्रीद कोरलेलं आहे. हनुमान म्हणजे बल देणारी देवता, जिंकण्याचा ताण असो किंवा कठीण क्षण, हा टॅटू मला मानसिक बळ देतो. असे दीप्ती म्हणते. 3 / 6स्नेह राणा ही उत्तराखंडची खेळाडू आहे. तिनेही टॅटू गोंदवून घेतला आहे. तिने 'विरोधी' हा एकच शब्द गोंदवला आहे. हा शब्द सामना सोपा असो वा अवघड, ती कायम तयार असते, असे सांगतो. तिच्या पायावर कोरलेला सिंह आणि गरुड तिच्या नेतृत्वगुणांचे प्रतिक आहे. एक विशेष संस्कृत वाक्य तिच्या टॅटूमध्ये दिसतं ,'तव धैर्यं तव बलम् अस्ति' याचा अर्थ,'धैर्य हेच खरं बळ' असा आहे.4 / 6बंगालची खेळाडू ऋचा घोषच्या हातावर बंगाल टायगरचा टॅटू आहे. हे केवळ चित्र नाही, ऋचाचे बंगाली असल्यामुळे त्या वाघाशी खास नाते आहे. तो तिचा अभिमान आहे. ऋचाने ठरवलं होतं, भारतासाठी खेळायची संधी मिळाली तर बंगाल वाघाचा टॅटू गोंदवून घेईल. तिने ठरवल्याप्रमाणे टॅटू गोंदवला.5 / 6भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्या व्यक्तिमत्वासाठी कायमच चर्चेत असते. तिच्या हातावरही टॅटू कोरलेला आहे. तिने आईचं नाव कोरलेलं आहे. मैदानात उतरताना तो टॅटू तिला बळ देतो. आईचे नाव ताकद देते.6 / 6आजकाल मजा म्हणूनही विविध टॅटू गोंदवले जातात. मात्र हातावरील गोंदण हे चिन्ह असते. तसेच प्रतिक असते. मानसिक बळ देण्यासाठी हे टॅटू शक्तिशाली मानले जातात. भारतात फार पूर्वीपासून गोंदवण्याची पद्धत आहे. टॅटूही काही तसाच प्रकार आहे.