शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

Published:January 21, 2024 02:29 PM2024-01-21T14:29:10+5:302024-01-21T14:35:15+5:30

Who is Sana Javed, the new Mrs. Shoaib Malik : सना-शोएबचं लग्न अनेकांना अमान्य, पण तिचंही आहे हे दुसरं लग्न, आधीचं लग्न मोडलं कारण..

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आपल्या कामगिरीमुळे तर प्रसिद्ध होतीच, पण आपल्या वैवाहिक जीवनामुळेही सोशल मीडियात कायम चर्चेत राहायची. सानिया मिर्झा हिने २०१० साली पाकिस्तानी संघाचे खेळाडू शोएब मलिकसोबत निकाह केला. पाकिस्तानच्या खेळाडूशी लग्न करण्यावरून सानिया मिर्झाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या दोघांचे नाते १४ वर्ष टिकले. पण शोएबने तिसरं लग्न केल्यापासून अनेकांना, खासकरून सानियाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे(Who is Sana Javed, the new Mrs. Shoaib Malik).

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

मुख्य म्हणजे संसार मोडल्यापासून तिच्या सवतीची चर्चा प्रचंड सुरु आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली असून, हे शोएबचं तिसरं लग्न आहे, तर सनाचं हे दुसरं लग्न असल्याचं बोललं जात आहे. पण सना नक्की आहे तरी कोण? तिची आणि शोएबची भेट झाली कशी?

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा निकाह २०१० मध्ये हैद्राबाद येथे झाला होता. सुरूवातीला काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर शोएब आणि सानियाने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला इझहान नावाचा चार वर्षांचा मुलगा देखील आहे. पण काही महिन्यांपूर्वी या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचं ठरवलं.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

आता सानियाची जागा सनाने घेतली असून, ही सना नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. सना जावेद ही पाकिस्तानी अभिनेत्री असून, ती उर्दू टेलीव्हिजनमधील नावाजलेला चेहरा आहे. तिने आतापर्यंत अनेक पाकिस्तानी नाटकांमध्ये काम केलं आहे.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

सनाचा जन्म २५ मार्च १९९३ रोजी सौदी अरेबिया येथे झाला. कराची विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, तिने २०१२ साली 'शहर-ए-झात' मधून पाकिस्तानी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. काला दोरीया, मुश्त-ए-खाक, डंक, रूसवाई, दार खुदा, आणि इंतजार सारख्या नाटकांमध्ये तिने कमालीची भूमिका साकारली आहे.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

अगदी लहान वयात तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत करिअरला सुरुवात केली. शोएब आणि सनाने काही जाहिरातींच्या शूटसाठी एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शोएब-सनामध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, सनाचे हे पहिले लग्न नसून, तिचं याआधीही लग्न झालं आहे. २०२० साली उमैर जसवालसोबत सनाने निकाह केला होता. उमैर हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आहे. त्याबरोबरच तो अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत निर्माताही आहे. तो रॉक ब्रॅण्डचा प्रमुख गायक असून, त्याचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण सना आणि उमैर यांनी गेल्यावर्षी घटस्फोट घेतला.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

लग्नानंतर शोएबने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. शोएबने सना जावेदसोबत निकाह केल्याचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. फोटोला कॅप्शन देत शोएबने लिहिले, 'अल्हम्दुलिल्लाह, आणि आम्ही दोघेही आता जोडी म्हणून एकत्र आलो आहे.'

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

शोएब आणि सनाच्या लग्नाला शोएबच्या कुटुंबियांचा विरोध होता. कुटुंबियातील एकाही सदस्याने लग्नात हजेरी लावली नाही. शोएब मलिकचा मेहुणा इम्रान जफर याने नुकतंच शोएबच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली. "मला शोएब आणि सनाच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाद्वारे मिळाली. त्यांच्या लग्नाला मलिक कुटुंबातील एकाही व्यक्तीने हजेरी लावलेली नाही", असे इम्रान जफर यांनी सांगितले.

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

शोएबचे कुटुंब सानियासोबत घटस्फोट घेण्याच्या विरोधात होते. शोएब आणि सानियामध्ये असलेले मतभेद दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले. पण शोएबने कुटुंबियांचे ऐकण्यास नकार दिला होता. शोएब आणि सानियाचा घटस्फोट झाल्यानंतर त्याचे कुटुंब खूप दुःखी होते.