तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

Published:October 13, 2023 08:51 PM2023-10-13T20:51:20+5:302023-10-13T21:00:28+5:30

Wamiqa Gabbi on her remarkable journey from Regional Cinema to Hindi Cinema and more : वामिका गब्बी जब वी मेट सिनेमातही होती, साईड रोल ते स्टारडमचा प्रवास

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

कमी कालावधीत रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारे कलाकार खूप कमी आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री वामिका गब्बी. तिची चर्चा सध्या अभिनेत्री तब्बूपेक्षा होत आहे. हो, आता तुम्ही म्हणाल ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?(Wamiqa Gabbi on her remarkable journey from Regional Cinema to Hindi Cinema and more).

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झालेला चित्रपट खुफियाची सर्वत्र चर्चा होत आहे. याच चित्रपटात वामिका गब्बीने कमालीची भूमिका साकारली आहे. तिचा अभिनय लक्षवेधी ठरत असून, तिच्या टॅलेण्टचे नेटकरी कौतुक करीत आहे.

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

तब्बूपेक्षा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा वामिका गब्बीची होत आहे. वामिकाने अली फजलच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या पात्राचे सर्वत्र चर्चा तर होतंच आहे, शिवाय ती ट्रेण्डिंगवर आहे.

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

यासह तिची 'ज्युबिली' ही वेबसिरीज देखील नेटकऱ्यांच्या पंसतीस उतरली होती. या सिरीजमध्ये वामिकाने महत्वाची भूमिका साकारली असून, तिने यात निलूफर हे पात्र साकारलं होतं.

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

वामिकाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फक्त हिंदीच नसून, पंजाबी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे. तिचे अनेक म्युझिक व्हिडीओ हिट झाले आहेत.

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

वामिकाचा जन्म २९ सप्टेंबर १९९३ रोजी चंदीगडमधील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिचे वडील गोवर्धन गब्बी हे लेखक आहेत, व ते हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये लिहितात. ते त्यांचं टोपण नाव म्हणून गब्बी वापरतात. तर, वामिकाची आई राज कुमारी शिक्षणतज्ज्ञ आहेत. यासह धाकटा भाऊ हार्दिक हा देखील एक अभिनेता आणि संगीतकार आहे.

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

वामिकाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. तिने २००७ साली जब वी मेट या हिंदी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हा वामिका १४ वर्षांची होती. यात तिने करीना कपूर म्हणजेच गीतच्या चुलत बहिणीची भूमिका साकारली होती.

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

यांनतर ती अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये दिसली. पण तिला हवं तसं यश मिळालं नाही. आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, ' खरंतर माझ्यावर काम मिळवण्याचं एवढं दडपण नव्हतं. कारण माझ्या पाठीशी माझे वडील होते. सिनेसृष्टीत ७ ते ८ वर्ष स्ट्रगल करत छोट्या-मोठ्या भूमिका मिळाल्या. पण २०१९ ला असं वाटलं की आता माझ्याकडून काही होणार नाही. पण नंतर हळू हळू गोष्टी बदलू लागल्या.'

तब्बूपेक्षा तिच्या अभिनयाची तारीफ जास्त, ती वामिका गब्बी कोण?

वामिका गब्बीने अमरिंदर गिल, हनी सिंह यांच्यासोबत देखील काम केले आहे. वामिका सोशल मीडियात खूप सक्रीय असते. ती तिचे बोल्ड फोटो सोशल मिडीयावर शेअर करते. तिच्या पोस्टला लाखोंच्या घरात लाईक्स मिळतात.