Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

Updated:June 9, 2025 15:59 IST2025-06-09T15:41:46+5:302025-06-09T15:59:30+5:30

Vat Purnima 2025 Rangoli Designs Simple Rangoli Designs : वटपौर्णिमेला काढा सुरेख एकापेक्षा एक आकर्षक रांगोळ्या, पाहा खास वटपौर्णिमेसाठी स्पेशल रांगोळी डिझाईन्स..

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

वटपौर्णिमेचा सण अगदीच उद्यावर (Vatpournima 2025) आला आहे. आतापर्यंत अनेकींची वटपौर्णिमेच्या पूजेची सगळी तयारी एव्हाना झाली असेलच. परंतु कोणताही भारतीय सण हा रांगोळी शिवाय अधूराच आहे( VatPurnima Rangoli Designs).

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

वटपौर्णिमेला देखील आपण वडाच्या झाडाची पूजा करण्यापूर्वी वडाच्या झाडाभोवती (Vat Purnima Rangoli Designs Simple Rangoli Designs) रांगोळी काढून सजावट करतो. यासाठीच, वटपौर्णिमेनिमित्त काढता येतील अशा सहजसोप्या रांगोळी डिझाईन्स पाहूयात.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते, यामुळे प्रामुख्याने या सणाचे महत्व ओळखून आपण वडाचे झाड रांगोळीत असेल अशा वेगवेगळ्या डिझाईन्सच्या सुंदर व आकर्षक रांगोळ्या काढू शकतो.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

वटपौर्णिमेला स्त्रिया पारंपरिक वेशभूषा आणि दागिने घालून, अगदी नटून - थटून वडाची पूजा करतात. त्यामुळे आपण रांगोळीत मंगळसूत्र, नथ असे सौंभाग्यलंकार काढून रांगोळी अधिक सुंदर करु शकतो.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

वटपौर्णिमेला सवाष्ण महिला एकमेकींना वाण म्हणून हळदी कुंकू, फळे देतात त्यामुळे या वाणाचा रांगोळीत असा वापर करता येऊ शकतो.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

अखंड सौभाग्यासाठी महिला ही वटपौर्णिमेची पूजा करतात, अशावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सौभाग्याचा संदेश देखील रांगोळीत लिहू शकतो.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

वटपौर्णिमेला हिरवा चुडा, तांदूळ, गहू, यांसारख्या अनेक वस्तूंचे विशेष असे महत्व असते. आपण हिरव्या चुड्याच्या मदतीने देखील अशी सुंदर रांगोळी काढून सजवू शकतो.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

याचप्रमाणे आपण वडाच्या झाडाच्या पूजेसाठी थाळी तयार करतो, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा वापर करून देखील आपण अशी नेहमीपेक्षा वेगळी पण रेखीव अशी रांगोळी काढू शकतो.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळ्या, डिझाइन सोपी आणि वेळही लागेल कमी...

वटपौर्णिमेला फक्त रांगोळीच नाही तर रांगोळी भोवती दिव्यांची आरास केल्याने देखील रांगोळी अधिक खुलून दिसेल.