1 / 11'स्वयंपाकघर' हे घरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण मानले जाते, पण त्यासोबतच स्वयंपाक घरात तितकेच काळजीपूर्वक वावरणेही गरजेचे असते. विशेषतः गॅस शेगडीजवळ (gas stove accident prevention) ठेवलेल्या काही वस्तूंमुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेकदा जागेअभावी किंवा सोयीसाठी आपण काही वस्तू गॅसजवळ ठेवतो, पण याच छोट्या चुका आगीसारख्या गंभीर दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतात.2 / 11स्वयंपाकघर हा कोणत्याही घराचा मुख्य भाग असतो आणि तिथली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे 'गॅस शेगडी'. रोजच्या घाईगडबडीत आपण स्वयंपाक करताना अनेक गोष्टी शेगडीच्या आजूबाजूला ठेवून देतो. 'दोन मिनिटांत तर वापरायची आहे,' असं म्हणून आपण अनेकदा कित्येक वस्तू शेगडीच्या अगदी जवळ ठेवतो. पण तुमची हीच 'दोन मिनिटांची' सवय घराला मोठ्या संकटात टाकू शकते.3 / 11गॅस शेगडीजवळ उष्णतेमुळे किंवा शेजारी उडणाऱ्या ठिणग्यांमुळे काही वस्तू क्षणात पेट घेऊ शकतात, तर काहींमधून विषारी वायू बाहेर पडू शकतो. त्यामुळे स्वयंपाकघर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी गॅस शेगडीजवळ कोणत्या वस्तू चुकूनही ठेवू नयेत, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 4 / 11अनेकदा काहीजण काम करताना पुस्तके, वर्तमानपत्रे वाचतात आणि ती तशीच किचनमध्ये ठेवून दुसऱ्या खोलीत निघून जातात. तसेच ऑनलाइन शॉपिंगनंतर आलेले कागदी बॉक्स, पॅकेट्स किंवा प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्यानंतरही अनेकदा तिथेच पडून राहतात. पण ही चूक धोकादायक ठरू शकते. किचनमध्ये फॅन सुरू असल्यास हे कागद किंवा प्लास्टिक उडून गॅस शेगडीजवळ जाऊ शकतात आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.5 / 11 पण गॅस पेटवण्यासाठी माचीस किंवा लायटरचा वापर करत असतो. पण अनेकदा गॅस पेटवल्यानंतर काहीजण माचीस किंवा लायटर गॅस शेगडीवरच ठेवून देतात. अशी चूक अजिबात करू नये. कारण या दोन्ही वस्तू ज्वलनशील असल्याने त्यांना पटकन आग लागू शकते. विशेषतः घरात लहान मुले असतील तर अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.6 / 11गॅसच्या उष्णतेमुळे प्लॅस्टिक वितळू शकते. शेगडीजवळ प्लास्टिकचे डबे किंवा चमचे ठेवल्यास ते गरम होऊन त्यांचा आकार बदलतो आणि प्लॅस्टिक जळल्यास त्यातून विषारी धूर निघतो, जो आरोग्यासाठी घातक ठरतो.7 / 11 हात पुसण्यासाठी वापरला जाणारा कपडा किंवा पेपर नॅपकिन अनेकदा आपण शेगडीच्या बाजूलाच ठेवतो. वाऱ्यामुळे किंवा गडबडीत हा कपडा शेगडीवर उडून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे कापडी वस्तू नेहमी दूर ठेवा.8 / 11 सॅनिटायझर, परफ्युम किंवा रूम फ्रेशनर यांसारख्या गोष्टींमध्ये 'अल्कोहोल'चे प्रमाण जास्त असते. या वस्तू अत्यंत ज्वलनशील असतात. गॅस चालू असताना यांच्या वापरामुळे किंवा संपर्कामुळे क्षणात मोठी आग लागू शकते.9 / 11 आजकाल रेसिपी बघत स्वयंपाक करण्याचा ट्रेंड आहे. पण मोबाईल फोन शेगडीजवळ ठेवल्याने तो ओव्हरहीट होऊन त्याची बॅटरी ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे फोन शेगडीपासून दूरच ठेवावा.10 / 11अनेकांना स्वयंपाकघरात औषधं किंवा सिरपच्या बाटल्या ठेवण्याची सवय असते. पण गॅस शेगडीच्या उष्णतेमुळे औषधांमधील रासायनिक घटक खराब होऊ शकतात, ज्यामुळे ती औषधे गुणहीन किंवा आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात.11 / 11तेल आणि तूप स्वयंपाकासाठी गरजेचे असले तरी त्याचे डबे शेगडीपासून सुरक्षित अंतरावर ठेवा. तेल लवकर गरम होते आणि गॅसची थेट ज्वाला किंवा जास्त उष्णता लागल्यास तेलाला अचानक आग लागण्याचा धोका असतो.