1 / 8रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण. दादाकडून काहीतरी छान भेटवस्तू घ्यायची आणि त्याच्या हातावर छान सुंदर राखी बांधून आयुष्यभर माझ्यापाठीशी उभा राहा. माझी रक्षा कर असे अप्रत्यक्षपणे सांगणे दादाला सांगायचे. 2 / 8दादासाठी छान सुंदर अशी राखी घ्यायला तर हवीच. ही राखी फक्त एक दोरा नसून नात्याचे प्रतिक आहे. त्यामुळे छान सुंदर राखीच हवी. 3 / 8लहान मुलांसाठी छान कार्टूनचे फोटो असणाऱ्या राख्या आजकाल फार लोकप्रिय आहेत. आवडत्या पात्राला राखीवर पाहून लहान मुलांना फार आनंद होतो. त्यामुळे जर भाऊ लहान असेल तर अशी राखी नक्कीच घ्या. 4 / 8दुसरी फार मागणीत असलेली राखी म्हणजे ओम , श्री असे शब्द लिहिलेल्या राख्या. त्यांचा रंग आणि डिझाइन फार सुंदर दिसते. कोणत्याही वयाच्या माणसाला बांधू शकता. 5 / 8लहान मुलांसाठी आणखी एक छान प्रकार म्हणजे बटणाची राखी. त्यावर लाईट बसवलेले असतात. राखीच्या मधोमध बटण असते ते दाबल्यावर लाईट लागतात. लहान मुलांना त्याची गंमत वाटते. 6 / 8घरी गोंड्याची राखी करता येते. अगदी सोपी आहे. लहान मुलींना अशा राखी तयार करुन दादाच्या हातावर बांधायला फार मज्जा वाटते. त्यामुळे जर बहीण लहान असेल तर तिला अशी राखी तयार करायला नक्की शिकवा. 7 / 8रंगीबेरंगी राखी बाजारात मिळते. विविध रंगाचे दोरे एकत्र करुन ही राखी तयार करतात. एकदम सुंदर दिसते. शाळेत तसेच कॉलेजात जाणाऱ्या भावाच्या हातावर एकदम सुंदर दिसले.8 / 8मोती , मणी ओवलेली राखी मिळते. फार सुंदर दिसते. रंगीत मोती, समरंगाचे मोती सारे प्रकार यात असतात. नक्कीच घ्यायला हरकत नाही. फार छान पॅटर्न आहे.