1 / 9सकाळच्या वेळी कामाची फार घाई गडबड असते. ऑफीसला जाण्याआधी घरातील कामे आटपून जावे लागते. कारण यायला उशीर होतो किंवा घरी आल्यावर कोणतेही काम करण्यासाठी ताकद उरत नाही.2 / 9या काही सोप्या टिप्स आहेत, ज्यांचा वापर केल्याने सकाळी डबा तयार करताना तो पटकन तयार होईल आणि तुम्हाला बाकीची कामे करण्यासाठीही वेळ मिळेल. 3 / 9डब्यासाठी भाजी निवडताना पटकन शिजणारीच भाजी निवडा. तरीही जर एखादी भाजी असेल जिला शिजायला वेळ लागतो तर, भाजी तयार करताना त्यामध्ये लगेच मीठ टाका. मीठामुळे भाजी लवकर शिजते. 4 / 9आजकाल भाज्यांसाठी चॉपर मिळतात. त्यांचा वापर करून झटपट भाज्या चिरता येतात. सुरीपेक्षा असे टूल्स वापरा.5 / 9आपल्याला लसूण सारखा वापरवा लागतोच. लसूण सोलण्याची क्रिया फार किचकट असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी भरपूर लसूण सोलून तो एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.6 / 9रस भाजी तयार करत असाल तर, ती कुकरमध्ये तयार करा. फोडणी तयार करून झाली की त्यामध्ये भाजी टाका. नीट परता मग त्यामध्ये पाणी घाला आणि एक शीटी काढून घ्या. भाजी पटकन तयार होते.7 / 9पोळ्यांची कणीक रात्री भिजवून ठेवली तरी, दुसर्या दिवशी खुसखुशीत पोळ्या तयार करता येतात. फक्त कणीकेला थोडं जास्त तेल लाऊन ठेवायचे. सकाळी लाटायला घेताना त्यावर पीठाचा हात मारायचा.8 / 9तुम्हाला जर कुरकुरीत भाजी तयार करायची नसेल तर, भाजी फोडणीला टाकल्यावर त्यामध्ये थोडे पाणी घाला. झाकण ठेऊन वाफ काढून घ्या. नंतर मसाले टाका. भाजी शिजायला फार वेळ लागत नाही.9 / 9भाज्यांमध्ये जर टोमॅटो पेस्ट वापरत असाल तर, टोमॅटो मिक्सरमधून फिरवून आइस ट्रेमध्ये ओता. त्याच्या क्युब वापरायला सोप्या पडतात आणि आठवडाभर टिकतातही.