भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

Published:December 19, 2023 02:26 PM2023-12-19T14:26:34+5:302023-12-19T14:33:08+5:30

Kiara Advani most searched person in India : कियाराबद्दल लोकं गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? ती टॉप मोस्ट सर्च अॅक्ट्रेस कशी बनली?

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

बघता-बघता काही दिवसात हे वर्ष सरेल. डिसेंबर महिन्याची ३१ तारीख जवळ येईल, व नव्या वर्षाची सुरुवात होईल. सरत्या वर्षाला निरोप देताना गुगलने यावर्षीची टॉप सर्च लिस्ट जारी केली आहे. ज्यामध्ये या वर्षी गुगलवर कोणत्या विषयावर आणि कोणत्या सेलेब्सना सर्वाधिक सर्च केले गेले, याची माहिती देण्यात आली आहे. ही यादी चार श्रेणींमध्ये विभागली आहे. या गुगल लिस्टमध्ये बी-टाऊनची स्टायलिश अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) अग्रस्थानी आहे. कमी कालावधीत बी-टाऊनमध्ये राज्य करणारी कियाराचा जलवा (Google most Searched Actress) गुगलमध्येही दिसून आला आहे(Kiara Advani most searched person in India).

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

२०२३ मध्ये कियारा अडवाणीला सर्वाधिक सर्च केले गेले. याशिवाय क्रिकेटर शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाचाही समावेश आहे. खरंतर कियाराला २०२३ हा वर्ष लकी ठरला. तिने या वर्षी अनेक हिट बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाय तिचा राजेशाही विवाह सोहळा हा लक्षवेधी ठरला. त्यामुळे ती ट्रेण्डवर होती.

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

७ फेब्रुवारी २०२३ रोजी कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. तिची लग्नाची एन्ट्री लक्षवेधी ठरली. शिवाय तिचा राजेशाही लेहेंगा आणि ज्वेलरीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं होतं. ज्यात अनेक दिग्गच कलाकारांनी हजेरी लावली होती.

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

लोकांनी कियारा हिने लग्नात घातलेल्या लेहेंग्यांची किंमत किती आहे, हे देखील सर्च केलं होतं. मोठ्या थाटात अभिनेत्रीचं लग्न झालं. शाही लग्नाबद्दल अनेक गोष्टी चाहते गुगलवर सर्च करत असतात.

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

कियाराच्या संदर्भात, नेटकऱ्यांनी विविध गोष्टी सर्च केल्या आहेत. कियाराचा लेहेंग्याची प्राईज किती? मंगळसूत्र डिझाईनची प्राईज किती?, कियाराचा वेडिंग रिसेप्शन लूक, कियाराचा एक्स नक्की कोण?, कियारा आणि सिद्धार्थचे वेडिंग फोटो यासह इतर काही गोष्टी कियाराबद्दलची माहिती मिळवण्यासाठी लोकांनी सर्च केले.

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

'कॉफी विथ करण ७' च्या मंचावर कियाराने त्यांच्या नात्याविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. 'सिद्धार्थ आणि माझी मैत्री खास मित्रापेक्षा थोडी जास्त आहे', असं कियारा म्हणाली होती. त्यानंतर त्या दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियात रंगली. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

कियाराचे अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यासह तिच्या वेब सिरीजचीही चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली. ती लवकरच 'गेम चेंजर' या चित्रपटात राम चरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

भारतीयांनी २०२३ मध्ये वर्षभर गुगल केलं तिचं नाव; कियारा अडवाणीची एवढी चर्चा का?

कियारा व्यतिरिक्त, नेटकऱ्यांनी शुभमन गिल, रचिन रविंद्र, मोहम्मद शमी, एल्विश यादव, सिद्धार्थ मल्होत्रा, ग्लेन मॅक्सवेल, डेविड बेकहम, सूर्यकुमार यादव, ट्रेविस हेड या दिग्गजांना सर्वाधिक सर्च केलं आहे.