विराट कोहलीच्या मागे मागे अवनीत कौर बिम्बलडनलाही पोहोचली? नक्की चाललंय काय तिचं..
Updated:July 9, 2025 16:52 IST2025-07-09T16:43:02+5:302025-07-09T16:52:26+5:30
Instagram viral, Avneet Kaur reached Wimbledon after Virat Kohli? social viral, Avneet Kaur : सोशल मिडियावर सध्या एकच चर्चा. अवनीत कौर आहे तरी कोण? विराटशी काय संबंध?

राजकुमारी यास्मीन म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारा चेहेरा म्हणजे अवनीत कौर. अलादीन या मालिकेतील तिची भूमिका फार गाजली. डान्स इंडिया डान्स च्या मंचावरुन प्रसिद्ध झालेली ही मुलगी अनेक मालिकांमध्ये झळकळी. तिचे इंस्टाग्राम व्हिडिओ आणि इतरही कंन्टेंट लोकांना पसंत पडतो.
सावित्री- एक प्रेम कहाणी, एक मुठ्ठी आस्मान , हमारी सिस्टर दीदी अशा विविध हिंदी मालिकांमध्ये ती दिसली. टीव्हीच्या विविध मालिकांमध्ये ती कायम दिसायची. फार गाजली होती. नंतर अचानक मालिकांमध्ये दिसायची बंद झाली.
नंतर मर्दानी या चित्रपटात तिची भूमिका लोकांना आवडली. मात्र नंतर तिने केलेल्या बॉलिवूडच्या कोणत्याच चित्रपटाला किंवा वेब सिरीजना यश मिळाले नाही. मात्र ती इंस्टाग्रामच्या माध्यामातून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहिली.
अवनीत कौर त्वचा आणि मेकअपबद्दल टिप्स तसेच इतर ब्यूटी टिप्स असे व्हिडिओ करत असते. कोणते मॉइश्चराईझर वापराल किंवा सनस्क्रीन वापरला असे विषय ती करते आणि लाखाच्या घरात तिच्या व्हिडिओवर लाईक्स असतात.
मात्र सध्या अवनीत चर्चेत आली ती एका वेगळ्याच विषयासाठी. सगळ्याच्या लाडक्या विराटमुळे अवनीत पुन्हा चर्चेत आली. अवनीतच्या एका इस्टाग्राम पोस्टवर विराटचे लाईक पाहून लोकांनी त्या विषयाचा प्रचंड बाऊ केला. विराटने नंतर लाईक काढलेही आणि चुकून केल्याचे स्पष्टीकरणही दिले.
मात्र तरी विराटने अवनीतची पोस्ट लाईक केल्याची चर्चा सगळ्या सोशल मिडिया साईट्सवर जोरदार चालली. विराट-अनुष्का विम्बल्डनमध्ये मॅच पाहायला गेले होते. मात्र तेथे अवनीत कौरही काहीच अंतरावर होती. सामन्यादरम्यान विराट जरा चिंतेत दिसला. त्याचाही संबंध अवनीतच्या उपस्थितीशी जोडला गेला.
विराट आणि अवनीतबद्दल चर्चा सुरु झाल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांसाठी ब्रॅण्ड पब्लिसिटी करताना अवनीत दिसली. अनेक वर्षे कोणत्याच चर्चेचा भाग नसलेली अवनीत अचानक पुन्हा चर्चेत आली.