Join us

पाण्याच्या बाटलीला कुबट वास येतो? १ सोपा उपाय- बाटलीतला घाण वास एका मिनिटात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 15:35 IST

1 / 7
पाण्याच्या बाटल्या आपल्याला रोजच लागतात. मुलांना शाळेत न्यायला, ऑफिसमध्ये घेऊन जायला. किंवा अन्य कोणत्या ठिकाणी जाताना पाण्याची बाटली नेहमीच सोबत लागते.
2 / 7
बाटली भरण्यापुर्वी आपण तिच्यामध्ये पाणी टाकून ती खाली- वर करून, हलवून धुवून घेतो. पण एवढं करणं बाटलीच्या स्वच्छतेसाठी पुरेसं नाही. अशाच पद्धतीने नेहमीच बाटली धुतली तर हळूहळू तिच्यातून कुबट वास येऊ लागतो.
3 / 7
हा वास कमी करण्यासाठी आता हा एक सोपा उपाय करून पाहा. बाटली धुण्यासाठी कोणतेही साबण किंवा डिटर्जंट वापरणे टाळा. कारण बाटल्यांची तोंंडं निमूळती असतात. त्यामुळे इतर भांड्यांप्रमाणे ती हाताने घासून स्वच्छ करता येत नाही. अशातच जर साबणाचे काही कण बाटलीच्या आतल्या भागाला चिकटून राहिले तर ते आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
4 / 7
त्यामुळे बाटली कशा पद्धतीने धुवायची ते पाहूया. हा उपाय करण्यासाठी बाटलीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला.
5 / 7
त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला. लिंबाच्या रसामुळे बाटलीचा दुर्गंध कमी होऊन ती स्वच्छ होण्यास मदत होते.
6 / 7
आता सोडा आणि लिंबाचा रस घातलेल्या बाटलीमध्ये १ ग्लास गरम पाणी घाला. बाटली वर- खाली करून हलवून घ्या. यानंतर बाटली धुण्याचा ब्रश घेऊन बाटली आतून घासून काढा.
7 / 7
यानंतर २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यास बाटलीतली घाण पुर्णपणे निघून जाईल आणि बाटलीतून येणारा दुर्गंध किंवा कुबट वास निघून जाईल.
टॅग्स : स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलपाणीहोम रेमेडीकिचन टिप्स