By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:50 IST
1 / 7बाल्कनीत कबुतरांचा वावर वाढला की घाण आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात. कबुतरांना पळवून लावण्यासाठी तसंच त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरातील काही वस्तू वापरू शकता. (How To Avoid Pigeons In Balcony)2 / 7 काळ्या मिरीची पूड कबुतरांच्या नाकात गेल्यास त्यांना अस्वस्थ वाटते त्यामुळे ते त्या जागेवर येत नाहीत.3 / 7बाल्कनीत कठड्यावर किंवा कोपऱ्यात लाल तिखट शिंपडल्यानं कबुतरांना तिथे बसणं कठीण होतं.4 / 7 लवंगाचा उग्र वास आणि त्यातील तेल कबुतरांना दूर ठेवण्यास मदत करते.तसंच ठेचलेला लसूण किंवा कांदासुद्धा कबुतरांना दूर करण्यास मदत करतो.5 / 7मिठाच्या पाण्याचा सतत फवारा मारल्यानं त्या जागी कबुतरांना त्या वासानं पळवून लावता येते.6 / 7तमालपत्राचा वासही कबुतरांना अजिबात आवडत नाही ही पानं तुम्ही घरटी असलेल्या ठिकाणी ठेवू शकता. 7 / 7कबुतरांची विष्ठा आणि घरट्यांच्या काड्या त्वरीत साफ करा. या वासामुळे त्यांना ती जागा आपली वाटते.