Join us

घरात पालीच्या पिल्लांचा सुळसुळाट? घराच्या कोपऱ्यात ५ पदार्थ ठेवा, न मरता पाली जातील घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:22 IST

1 / 7
किचन असो किंवा हॉल, बाथरूम प्रत्येक ठिकाणी पाली दिसतात. पाली दिसल्या की किळस वाटते. पालींना दूर करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (5 Effective Ways To Get Rid Of Lizards)
2 / 7
घराच्या कोपऱ्यांजवळ, खिडकीवर तुम्ही काही रोजच्या वापरातले पदार्थ ठेवले तर पालींना घालवण्यास मदत होईल.यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरावे लागेल.(Natural Home Remedies To Remove Lizard From House)
3 / 7
पालींना कॉफीचा वास आवडत नाही. कॉफीमध्ये थोडी तंबाखू मिसळून त्याच्या लहान गोळ्या तयार करा आणि पाली फिरतात त्या ठिकाणी ठेवा ज्यामुळे पाली दूर होण्यास मदत होईल.
4 / 7
पालींना कांद्याचा तीव्र वास सहन होत नाही. कांद्याचा रस एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही पालींवर स्प्रे करू शकता. यामुळे पाली घरात प्रवेश करणार नाहीत.
5 / 7
मिरची पावडर किंवा अख्ख्या मिरच्या बारीक करून त्याची पेस्ट एका स्प्रे बॉटलमध्ये भरून हा स्प्रे पाली येतात त्या ठिकाणी मारा. यामुळे पाली दूर पळतील.
6 / 7
या गोळ्यांचा वास खूपच उग्र असतो. कपाटांमध्ये आणि बाथरूमध्ये या गोळ्या ठेवल्यास पाली येणार नाहीत.
7 / 7
पालींना तिखट आणि उग्र वास आवडत नाही. काळी मिरी आणि लसणाची पेस्ट एकत्र करून ती घरात ठेवल्यास पाली त्या ठिकाणाहून दूर पळतील.
टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडिया