1 / 6घराचं किचन स्वच्छ ठेवणं हे खूपच महत्वाचे असते. अनेकदा खूप साफसफाई केल्यानंतर कीटक, झुरळं वाढू लागतात. घरात घाण करण्यासोबतच ही झुरळं तुमच्या तब्येतीवरही चुकीचा परिणाम करतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही झुरळांना कायमंच घराबाहेर घालवू शकता. हे सोपे उपाय कोणते पाहूया. (How To Get Rid Of Cockroaches In The Kitchen Naturally)2 / 6 जर तुम्हाला किचनमधील झुरळांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही बेकींग सोडा आणि साखरेची पेस्ट बनवू शकता. झुरळं ज्या ठिकाणी येतात तिथे हे मिश्रण शिंपडा. ज्यामुळे झुरळांचा धोका कमी होतो3 / 6तमालपत्र झुरळांसाठी एक उत्तम उपाय आहे. छोटे कीटक, झुरळांपासून तुम्ही त्रासले असाल तर तमालपत्र तुमच्यासाठी परिणामकारक ठरू शकतं. तमालपत्र चुरून अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळं जास्त येतात. तमालपत्राच्या तीव्र वासाने झुरळं नाहिशी होतील.4 / 6 झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाचे तेल एक उत्तम उपाय आहे. कडुलिंबाचे तेल एंटी बॅक्टेरिअल गुणांनी परिपूर्ण असते. याचा वास झुरळांना अजिबात आवडत नाही. रात्री झोपण्याआधी कडुलिंबाचे तेल स्प्रे करा. यामुळे झुरळं कमी होतात.5 / 6लवंगाचा सुगंध झुरळांना अजिबात आवडत नाही. जर तुम्ही झुरळांपासून त्रस्त असाल आणि झुरळांचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही घराच्या कोपर्यात ८ ते १० लवंग ठेवा.6 / 6पुदिन्याच्या तेलात मीठ आणि पाणी मिसळून स्प्रे जागोजागो शिंपडू शकता. जेणेकरून सहज साफ करता येईल.