Join us

किचनच्या भिंतींवर पालींचा सुळसुळाट झालाय? ५ घरगुती उपाय करा-२ मिनिटांत पाली होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 21:59 IST

1 / 7
घराच्या भिंतीवर पाली फिरणं ही एक कॉमन समस्या आहे. अनेक लोक पालींना घाबरतात. (Simple Methods To Get Rid Of Lizards At Home) पालींना दूर घालवण्यासाठी किटकनाशकांचा वापर केला जातो. पण घरात जास्त प्रमाणात पाली असतील तर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. घरात असलेल्या नैसर्गिक उपायांचा वापर करून तुम्ही पालींना दूर पळवू शकता. ५ घरगुती उपायांनी तुम्ही पालींना घराबाहेर पळवू शकता. या उपायांनी पाली दूर पळण्यास मदत होईल.
2 / 7
लसूण आणि कांद्याचा तिखट वास पालींना आवडत नाही, या दोन्हींची पेस्ट बनवून तुम्ही पाण्याचा स्प्रे बनवू शकता. घराच्या भिंतीवर पाली दिसतील तिथे याने स्प्रे करा.
3 / 7
काळी मिरीची पावडर पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे तयार करा. अशा ठिकाणी शिंपडा जिथे पाली जास्त येतात.
4 / 7
नेफ्थलीन बॉल्सचा वास पालींना अजिबात आवडत नाही. घराचे कोपरे, दरवाज्यांजवळ हे बॉल्स ठेवा. यामुळे पाली दूर पळवण्यास मदत होईल.
5 / 7
पुदिन्याचे तेल पालींना दूर ठेवण्यासाठी तुमची मदत करू शकते. पुदीन्याचे तेल पाण्यात मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. नंतर या घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये पाली दिसतील तर याचा चांगला परिणाम दिसून येईल.
6 / 7
कॉफी पावडर आणि तंबाखू मिसळून याचे छोटे छोटे बॉल्स तयार करा आणि घराच्या कोपऱ्यांवर ठेवा यामुळे पाली दूर पळण्यास मदत होईल.
7 / 7
फिनाईलच्या बॉल्सचा दुर्गंध पालींना दूर ठेवण्याचे काम करतो. दरवाजे आणि खिडक्यांजवळ ठेवल्यानं पाली दूर होण्यास मदत होईल.
टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडिया