Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चहा गाळणी कळकट, घाण झाली म्हणून फेकू नका- 'या' पद्धतीने स्वच्छ करा, नव्यासारखी चकाचक होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2026 13:23 IST

1 / 6
चहा गाळणी बऱ्याचदा खूप कळकट होऊन जाते. तिच्यावर काळपट थर जमा होतो.(how to clean tea strainer?)
2 / 6
आपल्या नेहमीच्या पद्धतीने घासल्यास ही गाळणी स्वच्छ होत नाही. उलट आपण तिचा वापर जेवढा जास्त करू तेवढी जास्त ती काळवंडून जाते.(home hacks to clean tea strainer)
3 / 6
म्हणूनच आता कळकट झालेली चहा घासणी स्वच्छ करण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा.
4 / 6
हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला.
5 / 6
त्यामध्येच १ चमचा व्हाईट व्हिनेगर घाला. आता गाळणी या पाण्यामध्ये उकळत ठेवा. ८ ते १० मिनिटे चांगलं खळखळून उकळवून घ्या.
6 / 6
त्यानंतर गाळणी एखाद्या साध्या घासणीने घासून घ्या आणि पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्या. गाळणीचा काळेपणा कमी होऊन ती अगदी चकाचक झालेली दिसेल.
टॅग्स : स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडीकिचन टिप्स