स्टूलवर न चढता-हात न लावता पंखा होईल चकचकीत स्वच्छ; १ ट्रिक, जास्त वेगानं फिरेल पंखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:57 IST
1 / 6पंख्याची धूळ साफ करणं खूपच किचकट काम असतं. त्यासाठी स्टूलवर चढा, खु्र्चीवर चढा मग धूळ साफ करा अशी कसरत करावी लागते. पंख्याची धूळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (How To Clean Fan Without Getting Dust Everywhere)2 / 6पंखा साफ करण्याआधी त्याची वीज बंद करा. मेन स्विच बंद करणे अधिक सुरक्षित आहे. उशीच्या कव्हरमध्ये थोडे पाणी शिंपडा. कव्हर ओले केल्याने धूळ उडणार नाही आणि ती कव्हरला चिकटून राहील.3 / 6आता ओले कव्हर पंख्याच्या एका पात्यावर पूर्णपणे घाला. कव्हर पात्यावर पूर्णपणे घातल्यावर, ते हळू हळू बाहेरच्या दिशेने ओढा. त्यामुळे पात्यावरील सर्व धूळ कव्हरच्या आत जमा होईल.4 / 6 पंखा स्वच्छ झाल्यावर कव्हर बाहेर काढून झाडा आणि धुऊन टाका. ही पद्धत वापरल्यास तुम्हाला पुन्हा पुन्हा झाडू आणि कापड वापरण्याची गरज पडणार नाही.5 / 6जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर असेल, तर तुम्ही लांब हँडलचे ब्रश अटॅचमेंट वापरून पंखा साफ करू शकता. यामुळे धूळ शोषली जाते आणि ती खाली पडत नाही6 / 6वर्षातून एकदा पंखा साफ न करता, दर दोन ते तीन महिन्यांनी त्याची हलकी साफसफाई करा. यामुळे जास्त धूळ साचणार नाही आणि साफ करणे सोपे जाईल.