1 / 5शुभेच्छा म्हणजे कोरडे शब्द नसतात, कॉपी पेस्ट केलेले. त्या मनापासून द्याव्या. ‘तिला’ सांगावं मनापासून, तु आहेस म्हणून आम्ही आहोत.2 / 5आला फॉरवर्ड दिलं ढकलून, केली थट्टा अशा शुभेच्छा काय कामाच्या? तिला थोडी मदत, ताजा गरम वाफाळता चहा, एखादा गजरा, प्रेमानं धरलेला हात.. हे ही शब्दांपेक्षा बोलकं असतं..3 / 5तू अशी तू तशी तू त्यागमूर्ती या अपेक्षांच्या ओझ्यातून करायला हवी तिची सुटका. ती जे मायेनं करते त्याची कदर केली तर तिच्या कष्टांचं मोल होतं असं तिला वाटतं. ती कदर महत्वाची..4 / 5आदर द्यावा आणि घ्यावा. ज्या घरात तिचा आदर, ज्या घरात तिचा सन्मान ते घर जपतं घरपण. वेगळं काही नको असतं, हवा असतो जरासा प्रेमाचा आधार.5 / 5मायेनं तिच्यासाठी आपण काय करतो, तिला काय आवडतं, तिचं काय नावडतं? घरात माहिती असतं का कुणाला? तिची आवड पूर्ण करायला सवड काढणार का कुणी हा असतो खरा प्रश्न.