गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

Published:September 10, 2023 04:21 PM2023-09-10T16:21:22+5:302023-09-10T16:45:48+5:30

Ganpati Ganesh Festival Easy Decoration Ideas : दरवर्षी डेकोरेशन काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर घ्या आयडीया

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

गणपती बाप्पा वर्षभराने येणार म्हटल्यावर घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. या बाप्पाला विराजमान होण्यासाठी छान जागा, डेकोरेशन अशी सगळी तयारी केली जाते. दरवर्षी डेकोरेशन काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर झटपट करता येतील असे डेकोरेशनचे काही पर्याय पाहूया (Ganpati Ganesh Festival Easy Decoration Ideas)…

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

बाजारात हल्ली वेगवेगळ्या मटेरीयलपासून केलेले बरेच काही उपलब्ध असते. ते फक्त थोड्या कल्पक पद्धतीने अॅरेंज केले तर कमी वेळात चांगले डेकोरेशन करता येते.

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

थोडी जागा असेल आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर खऱ्या फुलांचे डेकोरेशन करु शकतो. हे डेकोरेशन फारच सुंदर आणि नैसर्गिक दिसते.

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये एखादा जरी कल्पक व्यक्ती असेल तरी थोडा वेळ देऊन आगळेवेगळे काही करायचे असेलत तर अशाप्रकारचे ग्लास किंवा कार्डशीटचा वापर करुन बरेच प्रकार करता येतात.

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

प्लॅस्टीकचा वापर करायचा नसेल तर लाकडी किंवा मातीच्या बेसचे पर्यावरणपूरक असे डेकोरेशन करणेही फार अवघड नसते. यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही.

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

फक्त ओढण्या किंवा रंगबिरंगी कापड आणि लायटींगच्या माळा यांचा वापर करुन सोपे आणि सुटसुटीत असा बॅकड्रॉप तयार करता येऊ शकतो. गौरी किंवा गणपती दोन्हीसाठी हे अतिशय चांगले दिसते.

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

युट्यूबसारख्या माध्यमावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ उपलब्ध असतात. घरातील लहान मुलांना घेऊनही आपल्याला साध्या कार्डशीटच्या माध्यमातून अतिशय सुंदर असे डेकोरेशन तयार करता येऊ शकते.

गणपतीसाठी कमी जागेत करा आकर्षक डेकोरेशन, पाहा एकसे एक झटपट-सोपे पर्याय...

अतिशय नॅचरल आणि तरीही आकर्षक असे डेकोरेशन हवे असेल तर आपल्या आजुबाजूला असणाऱ्या झाडांची पाने, विटा, लहान आकाराची रोपं यांचा वापर करुन सुंदर डेकोरेशन तयार होते.