पिठाला जाळं लागतं-पोरकिडेही दिसतात? डब्यात ठेवा १ पदार्थ, पीठ टिकेल अनेक महिने
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:58 IST
1 / 6पावसाळ्याच्या दिवसांत (Home Tips And Hacks) खाण्यापिण्याच्या बऱ्याच पदार्थांमध्ये किड लागणं,अळ्या येणं अशा समस्या उद्भवतात. हवेतील मॉईश्चरमुळे खाण्यापिण्याच्या पदार्थांची शेल्फ लाईफ कमी होते. गव्हाचं पीठ, बेसनाचं पीठ नेहमीच खराब होत असतं. ( Tricks To Protect Flour From Bugs)2 / 6कधी पिठाला (Home Hacks) जाळं लागतं तर कधी पोटकीडे, उडणारे छोटे किडे होतात. पिठाची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. या ट्रिक्स तुमचं काम वाढवणार नाही. पावसाळ्यातही पीठ चांगलं राहील. (Flour Spoiled Quickly From Moisture Adopt This Tricks To Protect Flour)3 / 6पावसाळ्याच्या दिवसांत पीठात किडे तयार होतात.घरगुती उपायांच्या मदतीनं तुम्ही किड्यांना दूर ठेवू शकता.पीठाच्या डब्यात 4 ते 6 सुकलेले तमालपत्र घाला.तमालपत्राचा वास किड्यांना दूर ठेवण्यास फायदेशीर ठरतो.4 / 6याव्यतिरिक्त पीठ खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही सुक्या कापडाची पोटली बनवून त्यात लवंग घालून ठेवू शकता. ही पोटली पिठाच्या डब्यात ठेवा. 5 / 6पिठात पोरकिडे होऊ नयेत यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता. कडुलिंबाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांचा वास किटकांना आवडत नाही यामुळेच पिठाला किड लागते. 6 / 6पीठ खराब होण्यासापासून वाचण्यासाठी हिंगाचा वापर करा. एका कापडाच्या पोटलीत हिंग घाला ही पोटली पिठाच्या भांड्यात घालून ठेवा. पावसाळ्याच्या दिवसांत किड लागण्यापासून वाचण्यासाठी या ट्रिक्स फॉलो करू शकता.