Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

Updated:October 17, 2025 13:44 IST2025-10-17T12:23:23+5:302025-10-17T13:44:48+5:30

flower rangoli For Diwali : रांगोळी काढण्यापूर्वी सर्व फुलांच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या करून घ्या. देठ किंवा खराब झालेले भाग काढून टाका.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

अनेकदा रांगोळ्या (Diwali 2025) काढायला आपल्यावेळ नसतो अशावेळी फुलांची रंगोळी काढून तुम्ही सुंदर सजावट करू शकता.रांगोळीसाठी झेंडू, गुलाब, शेंवती, यांसारख्या सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांची निवड करा.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

रांगोळी काढण्यापूर्वी सर्व फुलांच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या करून घ्या. देठ किंवा खराब झालेले भाग काढून टाका.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

गोल, चौकोनी, कमळ किंवा स्वास्तिक किंवा ओम यांसारखे सोपे भूमितीचे आकार निवडा कारण फुलांनी ते भरणं सोपं जातं.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

रांगोळीचे मुख्य डिजाईन आधी खडूनं किंवा रांगोळीच्या पांढऱ्या रंगानं काढून घ्या. ज्यामुळे फुलांची रांगोळी व्यवस्थित आकारात येते.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

फुलांच्या रंगांचा योग्य मेळ साधा. उदा. मध्यभागी पिवळा झेंडू, त्याला बाहेरून लाल गुलाबाची सीमा आणि त्यानंतर पांढरी शेवंती वापरा. कॉन्ट्रास्ट रंगामुळे रांगोळी अधिक उठून दिसेल.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

पाकळ्या एकावर एक किंवा एका थरात व्यवस्थित दाबून ठेवा जेणेकरून त्या वाऱ्यानं उडून जाणार नाहीत आणि रांगोळीला छान टेक्स्चर मिळेल.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

हिरव्यागार पानांच्या डिजाईन्समध्ये आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं लहान आतील भागासाठी वापरा यामुळे रांगोळीला नैसर्गिक लूक येतो.

Easy Diwali Rangoli : दिवाळीत दारासमोर काढा सुंदर, सुबक फुलांच्या रांगोळ्या; ८ सोप्या डिजाईन्स, उठून दिसेल दार

रांगोळीच्या मध्यभागी दिवा, पणती, कलश किंवा गणपतीची मूर्ती ठेवा. रांगोळी पूर्ण झाल्यावर फुलांवर हलकं पाणी शिंपडा. यामुळे फुलं ताजी राहतात आणि रांगोळी अधिक चांगली राहते. रांगोळीच्या कडांभोवती लगान तेलाच्या पणत्या किंवा टि लाईट कँडल्स ठेवून दिवाळीचा लूक आकर्षक बनवू शकता.