Join us
Daily Top 2 Weekly Top 5

AC आणि फॅन एकावेळी सुरु ठेवल्यानं काय होतं? बील कमी येतं की वाढतं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:46 IST

1 / 10
एसी खोलतील हवा थंड करते. तर पंखा ती थंड हवा संपूर्ण खोलीत वेगानं आणि एकसमान पसरवतो. पंख्याच्या हवेमुळे खोलीतील गरम हवा वर ढकलली जाते आणि कुलिंग इफेक्ट लवकर जाणवतो. (Cooling Tips Ac Fan Together Benefits Electricity Saving Tips)
2 / 10
जेव्हा तुम्ही पंखा सुरू करता तेव्हा एसीचं तापमान २४ डिग्री सेल्सियस किंवा २५ अंश डिग्री सेल्सियसवर सेट केले तरीही खोलीतील २२डिग्री सेल्सियससारखा गारवा जाणवतो. (Easy Ways To Run Air Conditioner Without The Huge Electricity Bill)
3 / 10
एसीचे तापमान प्रत्येक १ डिग्रीनं वाढवल्यास साधारण ६ टक्के विजेची बचत होते.
4 / 10
पंखा खूप कमी वीज खातो पण त्याच्या मदतीनं एसीचे तापमान वाढवून ठेवल्यामुळे एसीच्या कॉम्प्रेसरवर कमी ताण पडतो आणि वीज बील कमी येते.
5 / 10
एसी खोलीतील हवा थंड करतो आणि पंखा ती थंड हवा संपूर्ण खोलीत वेगानं पसरवतो. यामुळे खोली सर्व कोपऱ्यांमध्ये लवकर थंड होते.
6 / 10
पंख्याच्या हवेमळे आपल्या अंगावरील घाम लवकर सुकतो ज्यामुळे खोलीचे प्रत्यक्ष तापमान जास्त असूनही आपल्याला प्रत्यक्षात जास्त गारवा जाणवतो.
7 / 10
संशोधनानुसार एसीचे तापमान प्रत्येक २ डिग्री सेल्सियसने वाढवल्यास सुमारे ६ टक्के विजेची बचत होते. त्यामुळे २४ डिग्री सेल्सियसवर एसी ठेवल्या वीज बील लक्षणीय कमी येते.
8 / 10
एक सामान्य पंखा फक्त ३० ते ६० वॅट वीज खातो. एसीच्या तुलनेत पंख्याचा वीज वापर नगण्य असल्यामुळे दोन्ही एकत्र चालवणं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतं.
9 / 10
एसीची थंड हवा जड असल्यामुळे खाली बसते आणि गरम हवा वर राहते. पंख ाही हवा सतत फिरवत ठेवतो. ज्यामुळे खोलीत सर्वत्र एकसमान तापमान राहते.
10 / 10
जर तुमच्याकडे इन्व्हर्टर एसी असेल तर पंख्याच्या साथीनं तो अतिशय कमी पॉवरवर चालतो. ज्यामुळे विजेची बचत दुप्पट होते.
टॅग्स : सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजन